तालुका विज्ञान प्रदर्शनात आरसीपी संस्थेचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 10:20 PM2019-12-04T22:20:15+5:302019-12-04T22:20:48+5:30

सांगवी : समारोपप्रसंगी रंधे यांच्या हस्ते पारितोषिक वाटप; गटातील २१ विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव

 RCP institute dominates in taluka science exhibition | तालुका विज्ञान प्रदर्शनात आरसीपी संस्थेचे वर्चस्व

Dhule

Next

शिरपूर : तालुक्यातील सांगवी येथील गोरखनाथ महाजन माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवशीय ४१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप बुधवारी झाला. यावेळी विविध गटातील २१ विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला़ या प्रदर्शनात आऱसी़पटेल संस्थेतील विद्यार्थ्यांनी वर्चस्व राखले़
४ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्थेच्या प्राचार्या डॉ़विद्या पाटील यांच्या उपस्थितीत समारोप झाला. किविप्र संस्थेच्या खजिनदार आशा रंधे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले़
यावेळी आऱसी़पटेल संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ़उमेश शर्मा, गटशिक्षणाधिकारी एस़सी़ पवार, शिक्षणविस्तार अधिकारी पी़झेड़ रणदिवे, आरक़े़ गायकवाड, वासंती पवार, अ‍ॅड़नीता सोनवणे, ए़बी़ आव्हाड, जीक़े़ साळुंखे, डी़पी़बुवा, बी़एस़बुवा, जी़पी़ कुमावत, अनिल बाविस्कर, माधव देवरे, मनोहर पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आऱबी़भदाणे, आऱएस़ पाटील, सिध्दार्थ पवार, जगदिश पाटील, राकेश चौधरी, मुख्याध्यापक एम़एस़परदेशी, एस़एऩ रामीकर आदी उपस्थित होते़
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आशा रंधे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मुलांमध्ये अंधश्रध्दा मोठ्या प्रमाणात असते़ विज्ञान समजण्यास कठीण असते़ बहुतांशी मुलांनी सुधारीत शेतीवर आधारीत प्रयोग सादर केले आहेत़ सद्यस्थितीत पर्यावरणाचा समतोल राहिलेला नाही त्यामुळे आता पर्यावरण पूरक अशी शेती करता येवू शकते, असेही त्यांनी सांगितले़
प्राचार्या डॉ.विद्या पाटील यांनी सांगितले की, बऱ्याचदा आपण शिक्षकांच्या मदतीने उपकरण तयार करतो, मात्र त्या उपकरणाची माहिती आपल्याला सांगता येत नाही़ त्यामुळे त्यांचे बोट धरा पण हात धरू नका़ प्लॅस्टीक किती घातक आहे, ते मनुष्यप्राण्यांसाठी अधिक घातक आहे़ जिल्हा लहान आहे, त्यात ४ तालुके मात्र त्यापैकी शिरपूर तालुका ज्याचा कुणी हेवा करावा अशा विज्ञानाच्या गोष्टी येथे, आहेत असा हा तालुका आहे.
या विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक शाळा व उच्च प्राथमिक असे इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या गटात १४, माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या गटात ५५, तसेच लोकसंख्या शिक्षण व शैक्षणिक साहित्य गटात शिक्षकांचे ९ अशी एकूण ७८ उपकरणे सादर करण्यात आली होती.
गटनिहाय अनुक्रमे विजेता विद्यार्थी, कंसात शाळेचे नाव व उपकरणाचे नाव असे-
प्राथमिक गट - प्रथम क्रमांक वंश हेमराज अहिरे (आरसीपी शिरपूर), वायरलेस टेक्नॉलॉजी, द्वितीय क्रमांक सार्थक गोविंद पटेल व मनिष अनिल पाटील (मुकेशभाई पटेल स्कूल तांडे) मॅथेमेटिक आॅफ मॉडेल, तृतीय क्रमांक अजित रामकरण राजपूत, सुकन्या धनराज बंजारा (जि़प़शाळा हाडाखेड) शाश्वत कृषी पध्दती़
आदिवासी गट - जितन विजय पावरा (आरसीपी आश्रमशाळा, वाघाडी) भविष्यकालीन परिवहन व संचाऱ
माध्य़ व उच्च माध्यमिक गट - लोकेश पाटील (आरसीपी इंग्लिश स्कूल शिरपूर) स्मार्ट कॉपी क्यूप्स थिप, दिग्वीजय नानु पाटील (आरसीपी शिरपूर) स्मार्ट हेलमेट सिस्टीम, कामिनी छोटू पाटील (ब़नाक़ुंभार वाघाडी) गणितातील जादू, उत्तेजनार्थ तुषार मंसाराम भील (सांगवी) यंत्र मानव़
आदिवासी गट - राजेश मोखन पावरा (अनेर डॅम) स्वच्छता व आरोग्य अ‍ॅटोमेटीक क्लीनऱ
प्राथमिक शिक्षक गट - अर्जून भानुदास गवळी (आश्रमशाळा सांगवी) खेळ प्रकाश किरणांचा, कामिनी अशोक देवरे (आरसीपी वरवाडे) स्ट्रा वेव, गजानन ज्ञानेश्वर लांबडे (आरसीपी आश्रमशाळा शिरपूर) मनोरंजनातून गणित़
माध्यमिक शिक्षक गट
नितीन एकनाथ चौधरी (आरसीपी शिरपूर) दृष्य गणित, चंद्रकांत सोनार (डॉ़पा़रा़घोगरे शिरपूर) टोटल ट्रिग्नोमेंट्री, व्ही़एम़मराठे (आश्रमशाळा सांगवी) मॅथेमेटिकल मॉडलींग़प्रयोगशाळा परिचर गट - ज्ञानेश्वर शालीग्रराम कुवर (अर्थे), चालती फिरती प्रयोग शाळा, कैलास भगवान नांद्रे (सांगवी) रहस्य विज्ञानाचे़
लोकसंख्या शिक्षण माध्यमिक गट :- प्रा़अनिल अंबर पाटील (डॉ़घोगरे शिरपूर) लोकसंख्या शिक्षणाची जनजागृती़
जि़प़/खाजगी प्राथ़शाळा
भाविका मनोज पाटील (एचआरपी शिरपूर) गणितीय खेळ, हेमांगी माळी, भुमिका माळी (आंबे) शाश्वत शेती, मोहित रविंद्र पाटील (अर्थे) ध्वनीपासून विज निर्मिती़
परीक्षक म्हणून शैलजा पाटील, सी़एऩमोरे, जावीद शेख, नितीन पाटील, वैशाली खरे, आऱझेड़ रणदिवे, उदय भलकार, एस़ जे़ पाटील, मनिषा पाटील, नरेंद्र महाजन, डी़ ए़ चौधरी, निलेश पाटील, डॉ़ एस़ आऱ पाटील, ए़ए़पाटील, किशोर गाडीलोहार, एऩई़चौधरी यांनी काम पाहिले.

Web Title:  RCP institute dominates in taluka science exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे