मानव समाजासाठी खरी गरज नितीमूल्यांची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 09:54 PM2019-06-22T21:54:38+5:302019-06-22T21:54:52+5:30

संडे अँकर । प्रजापिता ब्रम्हाकुमारीज केंद्राच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी राजयोगीनी विजयादिदिंचे प्रतिपादन

Real need for human society | मानव समाजासाठी खरी गरज नितीमूल्यांची 

फीत कापून केंद्राचे उदघाटन करताना विजयादीदी. सोबत प्रकाश क्षीरसागर, घनश्याम पवार, सुमन ठाकरेआदी. 

Next

विशाल गांगुर्डे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : मानव समाजाला खरी गरज नितीमूल्यांची आहे. एकजुटीनं प्रामाणिक प्रयत्न केल्यास सर्व समस्या प्रश्नांवर उपाय शक्य आहे. आपापसातील द्वेष, वैरभाव, तिरस्कार विसरून परस्पर सहयोग, आदर, प्रेमसारखी नितीमूल्य समाजात बाणवण्याची आज आवश्यकता आहे असे प्रतिपादन ब्रम्हाकुमारी विजयादीदी यांनी प्रतिपादन केले.
साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथीले प्रजापिता ब्रम्हाकुमारीज केंद्राच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. ‘नितीमूल्याधिष्ठीत समाजाचे निर्माण’ ह्या ब्रम्हाकुमारीजच्या उपक्रमात जास्तीत जास्त सहभागाची आता खरी गरज आहे, असे सांगत दीदींनी सर्वांना केंद्रास भेट देण्याचे आवाहन केले.  घनश्याम पवार आपल्या मनोगतात म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती जेव्हा ज्याही स्थितीत असते त्याला ती स्वत:च सर्वस्वी जबाबदार असते. कर्माची गती अतिशय गुह्य आहे, आपले विचारवाणी कर्मच आपलं नशिब घडवत असतात. तेव्हा आपल्या विचारवाणी कर्मांवर आपले लक्ष असावे. त्यानंतर प्रकाश क्षीरसागर, प्रभाकर भाई, भोगेभाई यांनीही सभेस मार्गदर्शन केले. तत्पूर्वी उषा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून सद्भावना फेरी काढण्यात आली. देशशिरवाडे गावाचे सरपंच सुमर्न ठाकरे, उपसरपंच निलेश पगारे, जि.प. सदस्य विलास बिरारीस, सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच विजय महाजन यांच्या उपस्थितीत ब्रम्हाकुमारीज केंद्राच्या नवीन वास्तूचे उद्घाटन तथा ध्वजारोहण पार पडले.  शेवटी सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमास धुळे, नंदुरबार, नेर, अंतापुर, जायखेडा, बल्हाणे, चिकसे, पानखेडा, सामोडे, पिंपळनेर तथा परिसरातून बी.के.परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुकाराम सोनवणे, साधना जगताप, दिगंबर सोनवणे, रुपाली पगारे, रोहिणी हिरे, पार्वती सोनवणे, काशिनाथ दुसाने, गुरुदत घरटे आदींनी परिश्रम घेतले.


उपाय तोकडे़़
आजचा मनुष्य हा अनेकानेक समस्यांनी ग्रस्त दिसतो, सर्वच क्षेत्रात सततची जीवघेणी स्पर्धा, स्वास्थ्य, बेरोजगारी, भ्रष्टाचार, त्यातच पुन्हा दुष्काळ, नापिकी, पाणी टंचाई सारख्या नैसर्गिक आपदा, या सर्वांनी तो पुरता हतबल झालाय. समस्या सोडवण्यासाठीचे त्याचे सर्वप्रकारचे उपाय तोकडे ठरताहेत. येणारा काळ तर आणखीच भीषण असू शकेल. तेव्हा ह्या प्रश्नांवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची अत्यंत गरज आहे, मानवी प्रयत्नांना अध्यात्माचीही जोड हवी.

Web Title: Real need for human society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे