बालमनांचा पालकांसाठी वास्तववादी अविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:56 PM2020-01-10T22:56:16+5:302020-01-10T22:56:29+5:30
राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप : अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या बालमनांचे सादरीकरण
धुळे येथील स्त्री शिक्षण संस्थेने प्रकाश पारखी लिखित, केदार नाईक दिग्दर्शित एप्रिल फूल हे बालनाट्य सादर केले. आजकाल शिक्षणाच्या मागे पळताना क्लास-ट्यूशनच्या व्यापात मुलांना खेळायलाही वेळ मिळत नाही. पण १०-१२ वर्षापूर्वी मुलं रविवारी हक्काने हवं तेवढं खेळायची.
आईवडील घरी नसल्याची संधी साधून अश्विनी, नूतन, शिल्पा, सुनीता, अनिता या मुली नाटकाचा खेळ खेळतात. त्यांच्या या खेळात शैलेश, दिनेश, मंगेश, नचिकेत हे देखील सामील होतात.
या खेळातील गंमती, जंमतीतून उलगडत जाणाऱ्या या बालनाट्यात साहिल काळे, राज कुलकर्णी, राघवेंद्र कचवाह, वेदांत मोरे, प्रणाली कासार, ग्रीष्मा पाटील, पूजा पाठक, समीक्षा भडागे, गायत्री भांडारकर, वैष्णवी कुलकर्णी, पूजा विसपुते या बालकलावंतांनी अभिनय केला. तांत्रिक बाजू चैतन्य जोग (नेपथ्य), सुजय भालेराव (प्रकाशयोजना), जयेश सूर्यवंशी (पार्श्वसंगीत), केतकी म्हस्कर (रंगभूषा), नीता जोशी (वेशभूषा), शीतल भालेराव, शिल्पा म्हस्कर, दिलीप काळे (रंगमंच व्यवस्था) यांनी सांभाळल्यात.
धुळे येथील लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्थे धनंजय सरदेशपांडे लिखित सुजय भालेराव दिग्दर्शित पडसाद हे बालनाट्य सादर केले. शहरी वातावरणात वाढलेली मुले निसर्गाच्या सान्निध्यात जातात.
या नैसर्गिक वातावरणाने त्यांच्यातील जाणिवा व संवेदना कशा जागृत होणाºया या बालनाट्यात, ऋषी, दिव्या, रवी आणि आदित्य हे चार मित्र त्यांच्या जंगलातल्या मित्राला भीमाला भेटतात. त्यासाठी चालत जाताना त्यांना उलगडणारा निसर्ग, पशू, पक्षी यांच्याबद्दलची माहिती यातून नाट्य निर्माण होत जाते.
या बालनाट्यात श्रेयस जोगी, वल्लभ ठाकूर, नारायणी सोनार, कार्तिकी ठाकूर, जगदीश वाघ, प्रणय कासार, सिध्देश बाविस्कर या बालकलावंतांनी अभिनय केला.
तांत्रिक बाजू सुजय भालेराव (नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा), केतकी म्हस्कर (पार्श्वसंगीत), हितेश भामरे (वेशभूषा), चैतन्य जोग, सिध्दांत मंगळे, राहूल मंगळे, जयेश सूर्यवंशी, हर्षल मराठे (रंगमंच व्यवस्था) यांनी सांभाळली.