सिद्धेश्वर गणपती मंदिराची साकारली प्रतिकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:45 PM2020-08-28T12:45:33+5:302020-08-28T12:46:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यावर्षी सार्वजनिक मंडळांनी आरास तयार केलेली नाही. मात्र घरोघरी बसविण्यात आलेल्या बाप्पाच्या ठिकाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यावर्षी सार्वजनिक मंडळांनी आरास तयार केलेली नाही. मात्र घरोघरी बसविण्यात आलेल्या बाप्पाच्या ठिकाणी भाविकांनी अनेकत्तोत्म आरास साकारलेल्या आहेत. यापैकी धुळ्यातील कुंभारे परिवाराने धुळ्यातील पांझरा नदीच्या किनारी असलेल्या सिद्धेश्वर गणेश मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारलेली आहे.
यावर्षी सर्वचठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. गणेशोत्सवात गर्दी होते, त्यातून पुन्हा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करीत शासनाने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे सार्वजनिक मंडळांना आवाहन केले. त्यानुसार मंडळांनीही त्याची प्रभावीपणे अंबलबजावणी केली. दरवर्षी जे मंडळे मोठमोठी आरास करीत होती, त्यांनी यावर्षी फक्त मूर्ती स्थापनेलाच प्राधान्य दिलेले आहे.
मात्र घरी साजऱ्या होणाºया या उत्सवाला कोणतीही मर्यादा घालून दिलेली नाही. शहरातील काही हौशी, उत्साही भक्तांना बाप्पाची मनोभावे स्थापना करून एकाहून एक सरस आरास केलेली आहे.
धुळ्यातील मोहिनी कोतकर व तनुजा कुंभारे यांनी शाडू मातीची मूर्ती तयार करून त्याची स्थापना केली आहे. लॉकडाऊनच्या काळात जगावरचे कोरोनाचे संकट टळू दे या प्रार्थने प्रित्यर्थ धुळ्यातील प्रसिद्ध अशा सिद्धेश्वर गणेश मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रतिकृती घरातील उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीपासूनच तयारी केलेली आहे. यात पुठ्ठा, कागद, रंग, काड्या, दोऱ्यांचे रिळ, याचा वापर केलेला आहे. कमी साधनांचा वापर करून बनवलेली कलाकृती चर्चेचा विषय ठरत आहे.