धुळे आयटीआयच्या १११२ जागांसाठी २४७९ अर्ज प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:12 AM2019-07-03T11:12:48+5:302019-07-03T11:13:45+5:30
गुरूवारी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होणार : इलेक्ट्रीशियन, फिटर ट्रेडला सर्वाधिक पसंती
आॅनलाइन लोकमत
धुळे : दहावीच्या निकालापूर्वीच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली होती. २० ट्रेडच्या १११२ जागांसाठी २४७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. पहिली प्राथमिक गुणवत्ता यादी ४ जुलै रोजी जाहीर होणार असल्याची माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य पी.एस. जैन यांनी दिली.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू लागलेला आहे. दरवर्षी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. मात्र यावर्षी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली होती. त्याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेला गती आली होती. विद्यार्थ्यांनी ३० जून दरम्यान आॅनलाइ अर्ज दाखल केले. आतापर्यंत २४७९ अर्जांची पडताळणी करण्यात आलेली आहे.
आयटीआयची पहिली प्राथमिक गुणवत्ता यादी ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले. जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीवर ४ व ५ जुलै रोजी हरकती घेण्यात येतील. पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ११ ते १५ जुलै या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी प्राधान्यक्रम १२ ते १६ जुलै दरम्यान सादर करण्यात येतील. दुसºया फेरीसाठी निवड यादी १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल. दुसºया फेरीतील प्रवेश २० ते २४ जुलै दरम्यान घेता येईल. तिसºया फेरीसाठी निवड यादी २९ रोजी जाहीर करण्यात यईल. या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३० जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान प्रवेश घेता येईल. चौथी फेरीसाठी निवड यादी ६ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर पाचवी फेरी समुपदेशनाची होईल. दरम्यान इलेक्ट्रीशियन व फिटर ट्रेडसाठी सर्वाधिक अर्ज आल्याचे सांगण्यात आले.