कराराने दिलेल्या १५ भूखंडांची माहीती प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:12 PM2019-03-11T22:12:10+5:302019-03-11T22:12:29+5:30
महापालिका : वर्षभरापासून चालढकल, कोट्यावधींच्या मालमत्तेकडे दुर्लक्ष
धुळे : महापालिकेकडून करार तत्वावर देण्यात आलेले १५४ भूखंड ताब्यात घेण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर महापौर चंद्रकांत सोनार यांनी या भूखंडांची माहिती सादर करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले होते़ त्यानुसार आतापर्यत १५ भुखंडाची माहीती प्राप्त झाली आहे.
गेल्या अनेक वर्षापासुन मनपा मालकीचे कराराने देण्यात आलेले १५४ भूखंड ताब्यात घेण्याबाबत कार्यवाहीचे आदेश असतांनाही त्याबाबत प्रशासनाकडून चालढकल सुरू होती़ त्यामुळे संबंधित जागांचे मुल्यांकन देखील अद्याप होऊ शकलेले नाही़ शहरात महापालिकेचे कोट्यावधी रूपयांचे मोकळे भूखंड विविध संस्था, संघटनांना करार तत्वावर देण्यात आले आहेत़ त्यापैकी बहूतांश भूखंडांच्या कराराची मुदत संपली असून त्यानंतरही मनपाने भूखंड ताब्यात घेण्याची करण्यात आलेली नव्हती़ भूखंडधारकांना वकीलामार्फत नोटीसा देण्यात आलेल्या होत्या़
१५ भुखंडाची माहीती प्राप्त
यासंदर्भात महापौर चंद्रकांत सोनार यांनी गुरूवारी नगररचना विभागाच्या अधिकऱ्यांची बैठक घेऊन सुचना देण्यात आल्या होत्या़ यावेळी तत्काळ कराराने दिलेल्या भूखंडाची यादी सादर करण्याचे निर्देश महापौर सोनार यांनी दिले होते़
करार संपलेले व नजीकच्या काळात करार संपणार असलेल्या भूखंडांची माहितीही सादर करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आली होती़ त्यानुसार शहरातील भुखंडाची माहीती घेतली जात आहे़ दरम्यान विभागाकडे करार संपलेले भुखंड, व इतर १५ भुखंडाची माहीती प्रात्त झाली आहे़ तर इतर भुखंडाची माहीती घेतली जात असल्याची माहीती सुत्रांनी दिली़
मनपाचा तीस वर्षांचा करार
नगरपालिका असताना संबंधित भूखंड केवळ स्थायी समितीत ठराव करून तीस वर्षांच्या कराराने देण्यात आले होते़ सामाजिक, शैक्षणिक संस्थांसह व्यवसायासाठी नाममात्र भाडे आकारून देण्यात आलेले हे भूखंड करार संपूनही ताब्यात घेण्यात आलेले नाही़
त्यामुळे बहूतांश भूखंडांवर मोठमोठ्या इमारती उभारण्यात आल्या आहेत़ तर काही भूखंडांवर अपार्टमेंट उभारून फ्लॅटची विक्री झाली आहे़
जाागंची परस्पर विक्री
शहरातील कराराने दिलेल्या जागा आजच्या परिस्थितीत अत्यंत गजबजलेल्या वस्तीत तसेच मोक्याच्या जागी असून काही जागांवर प्लॉट पाडून, इमारती बांधूनही त्या परस्पर विकण्यात आल्या आहेत़ त्यामुळे अशा जागामालकांकडून संबंधित जागांची आजच्या दरानुसार किंमत वसूल केली जाणार आहे़ आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मनपाची मालमत्ता किती हे समोर येणार आहे़ मनपाचे दवाखाने, शाळांच्या जागांचीदेखील तपासणी व मोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी अद्याप कार्यवाही झालेली दिसुन येते नाही़