१ हजार २३७ जागांसाठी २ हजार ३५५ अर्ज प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 10:24 PM2019-04-09T22:24:59+5:302019-04-09T22:25:35+5:30
आरटीई प्रवेश : प्रवेशासाठी पालकांची उत्सुकता
धुळे : बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिक दृट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतुद आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी २३५५ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. यासाठी पहिली सोडत पुण्यात निघाली. मात्र पहिल्या सोडतीत किती विद्यार्थ्यांची लॉटरी लागली ते समजू शकलेले नाही. मोफत प्रवेशाबद्दल पालकांमध्ये उत्सुकता वाढीस लागली आहे.