उपजिल्हा रूग्णालयातील परिचारिकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:30 PM2020-10-08T13:30:37+5:302020-10-08T13:30:51+5:30
दोंडाईचा : कोरोनाच्या काळात केलेल्या कार्याची रोटरी क्लब आॅफ सिनिअर्सने घेतली दखल
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : दोंडाईचा शहर व परिसरातील कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करणारे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारीका यांचा रोटरी क्लब आॅफ दोडाईचा सिनियर्स मार्फत सत्कार करण्यात आला. रोटरीचे गव्हर्नर प्रशांत जानी व हिता जानी यांच्याहस्ते गुलाबपुष्प व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
प्रशांत जानी म्हणाले की, कोरोनाच्या काळात दोंडाईचा रोटरी सिनियर्सने कोरोना बाबत चांगले कार्य केले आहे. राजेश मुणोत यांनी सांगितले की कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात सुरक्षित होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या वार्डात अहोरात्र सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी व परिचारीका यांचे योगदानामुळे आज दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातुन हजारो रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत.उपजिल्हा रुग्णालयातील व रोटरी कोविड केद्रांतील सर्व रुग्णांना प्रोटीन पावडरचे डबे तसेच सर्व कर्मचारी यांना सँनिटायझर व मास्क वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर अनिष शहा, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्जुन नरोटे, डॉ. हितेंद्र देशमुख, डॉ. सचिन पारख,डॉ. प्रफुल्ल दुग्गड, रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया, इनरव्हीलच्या अध्यक्षा मयुरा पारख, सचिव स्मितल गोस्वामी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी सिनियर्सचे सचिव राजेश माखिजा, रविंद्र पाटील, सौरभ मुणोत, प्रविण महाजन, डॉ. राजेंद्र पाटील, महेंद्र चोपडा, सौरभ अग्रवाल यांनी केले.