खुल्या जागांची तलाठय़ांमार्फत नोंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 12:12 AM2017-01-28T00:12:32+5:302017-01-28T00:12:32+5:30

महापालिका : शोध घेतल्यानंतर मोजणीला सुरुवात, तहसील प्रशासनाकडे मनपाचा पाठपुरावा

Record of open seats! | खुल्या जागांची तलाठय़ांमार्फत नोंद!

खुल्या जागांची तलाठय़ांमार्फत नोंद!

Next

धुळे : शहरातील  मोकळ्या जागा महापालिका प्रशासनाला शेवटी शोधाव्या लागल्या आहेत़ शोध घेतला असता त्या 584 जागा आढळल्या़ त्या आता नावावर लावून घेण्यासाठी धडपड सुरू झाली आह़े तहसील स्तरावर या मोकळ्या जागांच्या ले-आऊटच्या छायांकित प्रती पाठविण्यात आल्या असून तलाठय़ांमार्फत या जागा महापालिकेच्या नावावर लावून घेण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली़  
शहरात प्लॉट घेत असताना संबंधितांकडून जमीन सोसायटीच्या नावाने खरेदी केली जात़े सोसायटीसाठी जेवढी जमीन घेतली जाते, त्याच्या 10 टक्के जागा ही राखीव ठेवली जात असत़े सोसायटीची ही जागा ओपन स्पेस अर्थात मोकळी जागा म्हणून सार्वजनिक उपयोगासाठी वापरात आणली जाते, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली़
जागांचा शोध जारी
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी याबाबत सव्रेक्षण करण्याचे आदेश दिले होत़े सोनारांवर जबाबदारी
तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक नारायण सोनार यांची मालमत्ता तपासणी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती़ दरम्यान, तपासणीअंती मनपा क्षेत्रात 584 मोकळ्या जागा असून मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर अतिक्रमण होत असल्याचे समोर आल़े त्यानंतर मनपाकडून या जागांवर आपले नाव लावण्याची धडपड सुरू झाली होती़
प्रशासकीय पाठपुरावा
मनपा प्रशासनाने शहरातील मोकळ्या जागांचा शोध घेऊन त्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही सुरू केली आह़े त्यासाठी धुळे तहसीलदारांना पत्र देण्यात आले असून मोकळ्या जागांच्या सातबारा उता:यावर मनपाचे नाव लावण्यासाठी मोकळ्या जागांचे ले-आऊट सादर करण्यासाठी त्याच्या ङोरॉक्स प्रती काढल्या जात आहेत, तर दुसरीकडे सदर जागांची किंमत (व्हॅल्यूएशन) ठरविण्याचे कामही सुरू करण्यात आलेले आह़े संबंधित जागा कोटय़वधी रुपयांच्या असून त्या मनपाच्या मालमत्ता आहेत़ मनपाने कराराने दिलेल्या जागा ताब्यात घेण्याची कार्यवाहीदेखील सुरू केली आह़े
जागांचे मूल्य वाढणार
मोकळ्या जागांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात मोजणी सुरू झाली आह़े 584 जागांची मोजणी पूर्ण केल्यानंतर जागांचे मूल्य तपासण्यात येणार आह़े त्या निश्चित लाखोंच्या घरात असेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आह़े यासाठी तहसील प्रशासनाकडे महापालिका प्रशासनाचा पाठपुरावा सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आल़े

महापालिकेच्या ज्या काही मोकळ्या जागा आहेत त्या प्रशासनाच्या नावावर लावून घेण्यासाठी त्याच्या ले-आऊटच्या प्रती मागविण्यात आल्या आहेत़ आता हे काम तलाठय़ांमार्फत सुरू झाले आह़े
-ज्योती देवरे,
अपर तहसीलदार, धुळे शहर

Web Title: Record of open seats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.