एक महिन्यात तब्बल दीड कोटी वसूल
By admin | Published: June 2, 2015 04:06 PM2015-06-02T16:06:11+5:302015-06-02T16:06:11+5:30
महानगरपालिकेच्या वसुली विभागाने मे महिन्यात तब्बल दीड कोटी ३१ हजार रुपयांची वसुली केली आहे. आतापर्यंत एक महिन्यात होणारी वसुली काही लाखातच होत असल्याचे दिसून आले होते.
धुळे : महानगरपालिकेच्या वसुली विभागाने मे महिन्यात तब्बल दीड कोटी ३१ हजार रुपयांची वसुली केली आहे. आतापर्यंत एक महिन्यात होणारी वसुली काही लाखातच होत असल्याचे दिसून आले होते. वसुलीच्या रकमेत अशीच वाढ होत राहिली तर भविष्यात धुळे शहराला 'अच्छे दिन' येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
शहरात अनेक बांधकामे नवीन झाली असल्याने महापालिकेला मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नवनियुक्त आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच वसुली विभागाला कामाला लावले होते. त्यानंतरच्या महिनाभरातील कालावधीत वसुली विभागाचे काम सकाळी ९ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत अखंडितपणे सुरू असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी कारवाई करीत मोठी रक्कम वसूल करण्यात आली. तर दंडाच्या रूपानेदेखील वसूल झालेली रक्कम मोठी आहे. शिवाय या एक महिन्याच्या कालावधीत वसुली विभागाने हाती घेतलेले संगणकीकरणाचे कामदेखील पूर्ण केले असून लवकरच मालमत्ताधारकांना संगणकीय बिले दिली जाणार आहेत. त्यामुळे या सर्व कामाचे श्रेय अधिकारी व कर्मचार्यांना असल्याचे आयुक्तांनी सांगितले. भविष्यात वसुलीत आणखी वाढ होऊ शकते.