ऑपरेटरांकडून 10 लाखांची वसुली

By admin | Published: January 25, 2017 12:25 AM2017-01-25T00:25:07+5:302017-01-25T00:25:07+5:30

केबल व्यवसाय : 19 हजार 659 ग्राहकांनी बसविला सेट टॉप बॉक्स

Recovery of 10 lakhs from operators | ऑपरेटरांकडून 10 लाखांची वसुली

ऑपरेटरांकडून 10 लाखांची वसुली

Next

धुळे : शहरातील दोन केबल ऑपरेटरांकडील 15 लाख रुपयांच्या थकबाकीसाठी गेल्या महिन्यात कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या पैकी 10 लाख रुपये वसूल करण्यात प्रशासनाला यश मिळाले. अद्याप पाच लाखांची वसुली बाकी आहे. शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात  आतार्पयत 19 हजार 659 ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसविल्याची माहितीही मिळाली.
शहरातील थकबाकीदार केबल ऑपरेटरांना थकीत कराचा भरणा करण्यासंदर्भात प्रशासनामार्फत वेळोवेळी सूचना व नोटिसाही देण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे कानाडोळा केला जात होता. त्यामुळे धुळे शहर अपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी डिसेंबर महिन्यात याप्रकरणी कारवाई केली होती. शहरातील गरुड कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मल्टी सिस्टिम ऑपरेटर (एमएसओ)च्या केंद्रातील पॅचकार्ड सील करण्यात आले होते. त्यामुळे थकबाकीदार दोन केबल ऑपरेटरांकडील ग्राहकांचे केबल प्रक्षेपण थांबले होते.
10 लाखांचा भरणा
प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे संबंधित केबल ऑपरेटर व्यावसायिकांनी 15 लाख रुपयांच्या थकबाकीपैकी टप्प्याटप्प्याने 10 लाखांचा आतार्पयत भरणा केला आहे. उर्वरित रक्कमही लवकरच भरणा करण्याबाबत त्यांनी कळविले आहे. त्यामुळे प्रक्षेपण सुरू केल्याचे सांगण्यात आले.
दरमहा 8 लाखांचा महसूल
जिल्हाभरातील केबल ऑपरेटरांकडून जिल्हा प्रशासनाच्या करमणूक कर विभागाला दरमहा 8 लाखांचा महसूल मिळतो.
‘सेट टॉप बॉक्स’साठी मुदतवाढ
केबल ऑपरेटरांकडून केबल कनेक्शनधारकांची संख्या समाधानकारक दाखविली जात नाही. या मार्गे करचुकवेगिरी होते. ती यापुढे होऊ नये यासाठी राज्य शासनाने केबल डिजिटलायजेशन करण्याचा निर्णय घेतला असून त्या अंतर्गत प्रत्येक केबल कनेक्शनधारकास सेट टॉप बॉक्स बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी दिलेली मुदत डिसेंबरअखेर संपली. जिल्ह्यात अद्याप बहुतांश केबल कनेक्शनधारकांनी सेट टॉप बॉक्स बसविलेला नाही. त्यात ग्रामीण भागातील बहुतांश केबल कनेक्शनधारकांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील 17 हजार 795  पैकी केवळ 7 हजार 261 केबल कनेक्शनधारकांनीच सेट टॉप बॉक्स बसविले तर अद्याप 10 हजार 734 ग्राहकांनी ते बसविलेले नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यात केबल कनेक्शनधारकांची संख्या 31 हजार 484 एवढी आहे. त्यापैकी आज अखेर्पयत 19 हजार 659 ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसविल्याची माहिती करमणूक कर विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यात शहरी भागातील 12 हजार 398 ग्राहकांचा तर ग्रामीण भागातील 7 हजार 261 ग्राहकांचा समावेश आहे.
4जिल्ह्यात शहरी भागात (फेज 3) 13 हजार 689 तर ग्रामीण भागात 17 हजार 795 (फेज 4) केबल ग्राहक आहेत. त्यांना अनुक्रमे जानेवारी व मार्चअखेर्पयत सेट टॉप बॉक्स बसविण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.

Web Title: Recovery of 10 lakhs from operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.