दहिवद येथे बॉस्केट बॉल कोर्टचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 09:10 PM2019-01-02T21:10:50+5:302019-01-02T21:11:05+5:30
शिरपूर : आंतरराष्ट्रीय खेळासाठी लागणारे कोर्ट तयार
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील दहिवद येथील स्व़स्मिता पाटील निवासी पब्लिक स्कूलच्या आवारात सुमारे २२ लाख रूपये खर्च करून आंतरराष्ट्रीय खेळासाठी लागणारे बॉस्केट बॉल कोर्टचे लोकार्पण करण्यात आले़
दहिवद येथील स्मिता पाटील स्कूलच्या प्रांगणात बॉस्केट बॉल कोटचा लोकार्पण सोहळा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी स्मिता पाटील चॅरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ़अनिता देशमुख, सचिव अशोक अग्रवाल, ट्रस्टी ज्ञानेश्वर पाटील, मध्यप्रदेश स्पोर्ट इंडिया असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपकुमार आझाद, प्राचार्या कल्पना सिंह, उपप्राचार्या चंद्रकला तिवारी, अजय राणा, निलेश कुसमुडे, पायल जोशी तसेच शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते़ शाळेचे मैदान भव्य असल्यामुळे याठिकाणी राज्य-राष्ट्रीय स्पर्धा आतापर्यंत झाल्या आहेत़ भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धा व्हाव्यात या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष डॉ़अनिता देशमुख यांनी खेळाकडे अधिक लक्ष देवून सुमारे २२ लाख रूपये खर्च करून आंतरराष्ट्रीय खेळासाठी लागणारे बॉस्केट बॉल कोट तयार करण्यात आले आहे़ तसेच मुलांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी कोचची नियुक्ती करण्यात आलेली आहे़ भविष्यात याठिकाणी विविध मैदानी स्पर्धा होण्यासाठी शाळा प्रशासन सज्ज आहे़