भरकटलेल्या दोन बालकांना केले नातेवाईकांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:49 AM2018-03-04T11:49:39+5:302018-03-04T11:49:39+5:30

धुळे रिमांड होमच्या कर्मचाºयांना यश : खडतर प्रवास करून घेतला शोध, बालकांना पाहताच कुटुंबियांना झाला आनंद

Relieved of two children who had been strangled to the relatives | भरकटलेल्या दोन बालकांना केले नातेवाईकांच्या स्वाधीन

भरकटलेल्या दोन बालकांना केले नातेवाईकांच्या स्वाधीन

Next
ठळक मुद्देदोघ बालक घरातून होते बेपत्तापोलीस स्टेशनमध्ये नोंदही नव्हतीकर्मचाºयांनी परिश्रम घेत पालकांचा पत्ता शोधला



आॅनलाईन लोकमत
धुळे : भाषेची अडचण...दोघ मुलांना  पत्ताही धड सांगता येत नव्हता...अशाही परिस्थितीत बालगृहाच्या दोघ कर्मचाºयांनी  पहाडी भागात जाऊन, भरकटलेल्या मुलांना त्यांच्या नातेवाईकाच्या स्वाधीन केले. अनेक वर्षानंतर मुलांना बघितल्यावर नातेवाईकांच्या चेहºयावरही आनंद ओसांडून वाहत होता.
धुळे येथील मुलांच्या निरीक्षण गृह/बालगृह (रिमांड होम)मध्ये कृष्णा दिनेश कुमार (पावरा)(वय १५), व विशाल सिंध्या बामणे (वय १३) हे दोन महिन्यांपासून दाखल झाले होते.
कृष्णाचे वडील नरडाणा येथे कामाला होते. तेथूनच तो सहा वर्षांपूर्वी घरातून गायब झाला होता. कृष्णा रेल्वेत बसून मुंबई व तेथून हैद्राबादला गेला होता. तेथे तो रेल्वेत बसला होता.  मात्र लहान मुलगा एकटा रेल्वेत बसल्याचे पाहून, तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला  बाल कल्याण समिती हैद्राबाद येथे दाखल केले. त्यांच्या मार्फतच तो २९ जानेवारी १८ रोजी धुळे रिमांड होममध्ये दाखल झाला.
 तर विशाल हा गेल्या एक-दीड वर्षांपासून गायब होता. तो बाल कल्याण समिती मुंबई यांच्यामार्फत ३ मार्च १८ रोजी येथील  रिमांड होममध्ये दाखल झाला होता. विशेष म्हणजे दोघांच्या गायब होण्याबाबत पोलीस स्टेशनला नोंदही नव्हती. त्यामुळे त्यांच्या पालकांचा, नातेवाईकांचा  शोध घेणे जिकरीचे होते. पोलीसही दोघांच्या पालकांचा शोध घेत होते, मात्र शोध लागला नाही.
अखेर बालगृहाच्या प्रभारी अधीक्षिका यु.एस. सैंदाणे, योगा शिक्षक राजदीप पाटील, यांनी संस्थेचे सचिव डॉ. एस.टी.पाटील यांच्याशी चर्चा करून बालकांच्या पालकांचा शोध घेण्यासाठी संस्थेतील दोन कर्मचाºयांची नियुक्ती केली.
बाल कल्याण समिती धुळ्याच्या अध्यक्षा रत्नमाला पाटील, सदस्या उषा साळुंखे यांचे आदेश घेऊन संस्थेचे दोन कर्मचारी बालकांना सोबत घेऊन शिरपूर परिसरात गेले. बालगृहातील कर्मचारी राकेश पाटील व किसन पावरा यांनी पहाडी भागात खडतर  प्रवास सुरू केला. आजुबाजुच्या गावात, पाड्यांमध्ये तसेच बोराडी येथील पंडित नेहरू शाळेतील लिपीक, कर्मचाºयांशी संपर्क साधला.  हे करत असतांना एका बालकांने या कर्मचाºयांची दिशाभूल करत उलट दिशेचा रस्ता दाखवला.
मात्र ग्रामस्थांनी हा बालक चुकीची माहिती देत असल्याचे कर्मचाºयांच्या लक्षात आणून दिले. मात्र तरीही कर्मचाºयांनी संयम ठेवला. त्यांनी पाड्यांवरील लोकांची मदत घेऊन तपास करीत, बालकांच्या पालकांचा पत्ता मिळविला.
कृष्णा हा शिरपूर तालुक्यातील बोराडी गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील पाड्यावर राहत होता. त्याठिकाणी हे कर्मचारी पोहचले. कृष्णाचे पालक हे मजुरीनिमित्त सुरतला गेल्याचे समजले. या कर्मचाºयांनी कृष्णाला त्याच्या मामाच्या स्वाधीन केले.
त्यानंतर अजून ३० किलोमीटरचा प्रवास करीत हे दोघ कर्मचारी मलगाव या पहाडी गावात पोहचले. त्याठिकाणी विशालला वडील, आजी, आजोबाच्या स्वाधीन केले. बालकांना पहाताच त्यांच्या नातेवाईकांच्या चेहºयावर आनंद ओसांडून वाहत होता. तर एकाच दिवशी दोन्ही बालकांना त्यांच्या पालकाच्या ताब्यात दिल्याने, घेतलेल्या प्रयत्न व कष्टाचे चीज झाल्याचे समाधान राकेश पाटील व किसन पावरा यांना मिळाले.


 

Web Title: Relieved of two children who had been strangled to the relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.