जिल्हाभरात कँडल मार्च काढून शहिदांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:29 PM2019-02-17T22:29:53+5:302019-02-17T22:30:37+5:30

पुलवामा हल्ल्याचा निषेध : दहशतवाद्यांना धडा शिकवा-जनसमुदायाची संतप्त भावना

Remarks to martyrs after casting candle march across the district | जिल्हाभरात कँडल मार्च काढून शहिदांना आदरांजली

dhule

Next

धुळे : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना ठिकठिकाणी आदरांजली वाहण्यात आली. धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा तालुक्यातील विविध गावांमध्ये कँडल मार्च काढण्यात आला.
देगाव येथे आदरांजली
शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथे कँडल पेटवून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सरपंच प्रतिनिधी अभिमान कोळी, माजी सरपंच गिरधन पाटील, उपसरपंच राजेंद्र पाटील, अनिल कोळी, कमलाकर पाटील, रणजीत पाटील, रावसाहेब पाटील, सोनू पाटील, कारभारी पाटील, संजय ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.
न्याहळोदला दुकाने बंद
न्याहळोद येथे सकाळपासून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. गावातील सर्व चौकात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत रांगोळ्या काढण्यात आल्या. रात्री मेणबत्ती पेटवून रॅली काढण्यात आली. यात सुमारे साडेआठशे ग्रामस्थ सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी घोषणा देऊन हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.
वसमार येथे निषेध
वसमार येथे कँडल मार्च काढून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अहिल्यादेवी चौक ते बस स्टँड असा कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी तरुणांनी घोषणा देऊन निषेध नोंदविला.
म्हसदीत शहिदांना आदरांजली
म्हसदी येथे शैक्षणिक संस्थातर्फे शहिद जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी सरपंच चंद्रकांत देवरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष, शिवसेना संघटक व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
पिंपळनेरला मूकमोर्चा
पिंपळनेर येथे मुस्लीम समाजातर्फे पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच मुकमोर्चा काढून शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नौशाद सैय्यद, जावेद सैय्यद, अफसर सैय्यद, युनूस खान, लियाकत सैय्यद, जहूर जहागिरदार, अल्ताफ शेख, सद्दाम कुरैशी, साकीब सैय्यद, जफर शेख यांच्यासह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी प्रमोद गांगुर्डे, संभाजी अहीरराव, मुफ्ती इम्रान साहब यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Remarks to martyrs after casting candle march across the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे