जुन्या प्रथा-परंपरांना फाटा देत झाला पुनर्विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 11:00 PM2018-12-30T23:00:48+5:302018-12-30T23:01:11+5:30
पुनर्विवाह दोन्ही कुटुबांकडील सदस्यांच्या साक्षीने पार पडला
लोकमत न्यूज नेटवर्क
तिसगाव : विवाहाबाबतच्या प्रथा-परंपरांना फाटा देत धुळे तालुक्यातील नगाव रहिवासी अमृत धुडकू भदाणे यांची कन्या ज्योती व पारोळा तालुक्यातील विचखेडे येथील अरुण विनायक निकम यांचा मुलगा चेतन यांना पुनर्विवाह नुकताच झाला. त्यामुळे समाजात इतरांना यापासून प्रेरणा मिळणार आहे.
गुजरात राज्यातील सोनगड येथील विवाह मंदिरात हा पुनर्विवाह दोन्ही कुटुबांकडील सदस्यांच्या साक्षीने पार पडला. या विवाहासाठी डॉ.सतीश कवठळकर, प्रवीण भटू भामरे, संगीता प्रवीण पाटील, सरला प्रशांत पाटील, सतीश पाटील यांनी पुढाकार घेतला. या विवाहासाठी नगाव येथून भगवान पाटील, दत्तात्रय पाटील, संजय भदाणे, राकेश पाटील, किशोर पाटील, कैलास पाटील, चंदू पाटील, मामा गणेश पाटील, अनिल पाटील आदी नातलग उपस्थित होते.