आठवड्यात ग्राहकांना सेवा सुरळीत कराव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 08:33 PM2019-06-26T20:33:33+5:302019-06-26T20:39:35+5:30
बीएसएनएल : अधिकायांना दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यात भारतीय संचार निगम लिमिटेडच्या सेवा काही दिवसांपासून विस्कळीत आहे. यामुळे आॅनलाइन कामांचा बोजवारा उडाल्याने ग्राहकांसह विद्यार्थींना अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ ग्राहकांना सुरळीत सुविधा पुरविण्यात यावी अशा मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे़
ग्राहक सेवा ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक दाखले मिळण्यात अडचणी येत आहे़त्यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ तसेच जिल्ह्यातील हजारो लँडलाइन व सिमकार्ड धारकांना १० ते १२ दिवसांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंटरनेट सेवा ठप्प होत असल्याने महत्वाचे आॅनलाइन कामे रखडत आहेत.
कंपणीकडून आठवड्याभरात बी.एस.एन.एल कंपनीने सेवा सुरळीत करावी अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गौरव बोरसे, बंटी निकम, ऋषी चव्हाण, तुषार भामरे, पप्पू शिरसाठ, राज कोळी, कुणाल पाटील, विश्वजीत पाटील, आयुष्य जयस्वाल आदीसह राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.