भाडे सवलतीचा निर्णय योग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:16 PM2020-05-10T22:16:59+5:302020-05-10T22:17:20+5:30
परप्रतियांची व्यवस्था : माजी आमदार अनिल गोटे यांचे पत्रक
धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत़ त्यात परप्रांतीयांना घर जाण्यासाठी प्रवासी वाहतुकीत सवलत देण्यात आलेली आहे़ शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य असल्याची भूमिका माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी व्यक्त पत्रकान्वये व्यक्त केली आहे़
पत्रकात म्हटले आहे की, भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाग्रस्तांवर योग्य प्रकारे उपचार सुरु आहेत़ आहे त्या यंत्रणेवर काम मार्गी लावले जात आहे़ प्रारंभीच्या कालखंडात धुळे शहर आणि जिल्हा शंभर टक्के कोरोनामुक्त होता़ पंतप्रधानांनी प्रारंभापासूनच घरातून बाहेर पडू नका, असा सल्लाही दिला होता़ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यापुर्वीच लॉकडाउन घोषीत करुन विधी मंडळाचे कामकाज मुदतीपुर्व संपविले होते़ तरीही विषयाचे गांभिर्य लक्षात न घेता धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मुक्तपणे बाहेर फिरत होते, असा आरोपही त्यांनी केला़ मतदार संघात अनावश्यक जमाव गोळा करुन सामाजिक अंतर ठेवण्याचे भान ठेवत नव्हते़ त्याचा परिणाम धुळे शहर आणि धुळे जिल्हा रेड झोनमध्ये परावर्तीत होण्यात झाला़ सुरुवातीपासून गांभिर्य ओळखले असते तर जनतेला लॉकडाउनचा होणारा अकारण त्रास एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला नसता़ गरीबांना लॉकडाउनमुळे सहन कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टा तसेच लहान मुलांची होणारी उपासमार सहन करावी लागली नसती़ आपण सामाजिक हानी केली याची जाण राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना असायला हवी होती़ परराज्यातील मजूर, गोरगरीब, श्रमिक व हातावर पोट असणारे कष्टकरी आपल्या लहान मुलांना घेऊन रणरणत्या उन्हात संसारोपयोगी साहित्य डोक्यावर घेऊन आपल्या घराकडे पायी निघाले आहेत़ घराच्या ओढीने पायी निघालेल्या मजुरांचे हाल होऊ नयेत यासाठी सर्व वाहनांना त्यातल्या त्यात प्रवासी वाहतुकीला मुक्तपणे सुट दिली आहे़ ही समाधानाची व कौतुकाची बाब आहे़
दरम्यान, महामार्गावर पायी जाणाºया लोकांना मदत केल्यानंतर प्लॅस्टिकचा कचरा जमा झाला आहे़ त्या त्या भागातील स्थानिक प्रशासनाने या कचºयाची विल्हेवाट लावावी अशीही मागणी गोटे यांनी केली आहे़