फुटलेल्या पाटचारीची अखेर दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 04:38 PM2018-12-16T16:38:55+5:302018-12-16T16:39:18+5:30
आज सकाळी पाणी सोडणार : मालनगाव संघर्ष समितीने जेसीबी मशिन दिले उपलब्ध करून
लोकमत न्यूज नेटवर्क
दहीवेल : ऐन रब्बी हंगामात फुटलेली पाटचारी दुरुस्त होत नसल्याने शेतकºयांनी धरणे आंदोलनाचा पवित्रा स्वीकारताच अखेर युद्ध पातळीवर या पाटचारीची शनिवारी दुरुस्ती करण्यात आली. त्याद्वारे रविवारी सकाळी पुन्हा पाणी सोडले जाणार आहे. ही न्याय मागरी लावून धरल्याने ‘लोकमत’चे आभार व्यक्त होत आहेत. मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीने या प्रश्नाला वाचा फोडली. पाटचारी फुटून आठवडा उलटला तरी ती दुरुस्त करण्याबाबत पाटबंधारे विभागाची अनास्था उघड झाली होती. अखेर ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध होताच शनिवारी दुरुस्ती करण्यात आली. त्यासाठी मालनगाव संघर्ष समितीने जेसीबी मशिन उपलब्ध करून दिले. शुक्रवारी संघर्ष समितीची बैठक आटोपल्यानंतर सर्व पदाधिकारी व शेतकरी पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्यांना भेटले. सात दिवस होऊनही पाटचारीची दुरुस्ती का होत नाही, शेतकºयांना वेठीस का धरतात, असा जाब विचारला. तसेच कामास सुरूवात झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर समिती पदाधिकाºयांनी मध्यस्थी करत शेतकºयांना शांत करत जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले.