३० पैकी २९ जणांचा अहवाल निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 07:06 PM2020-04-27T19:06:14+5:302020-04-27T19:34:30+5:30
धुळे - येथील हिरे रूग्णालयातील प्रयोगशाळेत प्रलंबित ३० पैकी २९ अहवाल सोमवारी सायंकाळपर्यत निगेटीव्ह आले होते़ शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे ...
धुळे- येथील हिरे रूग्णालयातील प्रयोगशाळेत प्रलंबित ३० पैकी २९ अहवाल सोमवारी सायंकाळपर्यत निगेटीव्ह आले होते़ शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील कोरोनाग्रस्त महिलेच्या संपकार्तील व्यक्ती तसेच हिरे महाविद्यालयाच्या काही डॉक्टरांचा यात समावेश असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यत कोरोनामुळे जिल्ह्यातील चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. २० एप्रिल पासून दररोज पॉजीटीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होत होती. २० एप्रिल ते २६ एप्रिल या आठवडाभरात जिल्ह्यात २४ पॉजीटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तर १० एप्रिल रोजी जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉजीटीव्ह आढळला होता. दरम्यान सोमवारी २९ रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे दिलासा मिळाला आहे.