कोरोना चाचणीचे अहवाल त्वरीत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 09:42 PM2020-09-10T21:42:47+5:302020-09-10T21:43:40+5:30
शिवसेना : लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात भरती करा
धुळे : कोरोना चाचणीचा अहवाल तीन ते चार दिवस उशिरा प्राप्त होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संशयित रुग्णांचा कोरोना अहवाल त्वरीत मिळेल असे नियोजन करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
यासंदर्भात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, सह संपर्क प्रमुख अतुल सोनवणे, राजेंद्र पाटील, प्रियंका जोशी, गुलाब माळी, नंदलाल फुलपगारे, डॉ. जयश्री वानखेडकर आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने तपासणी देखील वाढली आहे. त्यामुळे संशयित रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल तीन ते चार दिवस उशिरा मिळत आहे. त्यातील काही रुग्णांना कोरोनाची लक्षणे आहेत तर काही रुग्णांना लक्षणे नाहीत. ज्या रुग्णांना लक्षणे आहेत त्यांना देखील अहवाल प्राप्त होईपर्यंत रुग्णालयात किंवा विलगीकरण कक्षात दाखल करुन घेतले जात नाही. असे रुग्ण घरी जातात तसेच बाहेरही वावरतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शिवाय अहवाल उशिरा प्राप्त होत असल्याने उपचारास देखील उशिर होत आहे. त्यामुळे मृत्यूदर वाढला आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर मात करायची असेल तर कोरोचा अहवाल त्वरीत द्यावा, लक्षणे असणाºया रुग्णांना रुग्णालयात तसेच विलगीकरण कक्षात दाखल करुन घ्यावे, हिरे वद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिका कोवीड सेंटरमध्ये बेडची संख्या वाढवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या पध्दतीने उपाययोजना केल्या तर मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल असेही निवेदनात म्हटले आहे.