जिल्ह्यातील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:32 PM2020-12-26T12:32:57+5:302020-12-26T12:33:06+5:30
धुळे : जिल्ह्यातील आणखी ७ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. तसेच शिरपूर येथील ३८ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा हिरे ...
धुळे : जिल्ह्यातील आणखी ७ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. तसेच शिरपूर येथील ३८ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील ३८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधीत रुग्णांची संख्या १४ हजार ३८८ इतकी झाली आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय धुळे येथील ४५ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, नरडाणा १, कुसूंबा १, सुशांत कॉलनी धुळे येथील एकाचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील सर्व १२ अहवाल निगेटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १८ अहवालांपैकी वासुदेव बाबा नगर, शिरपूर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच रॅपिड अँटीजन टेस्टचे ४ अहवाल निगेटीव्ह आले. भाडणे कोविड केंद्रातील ९ अहवालांपैकी शिवाजी नगर साक्री येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. महानगरपालिका रॅपिड अँटीजन टेस्ट मधील १५६ अहवालांपैकी शारदा नगर, देवपूर येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ४ अहवालांपैकी धुळे शहरातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एसीपीएम प्रयोगशाळेतील सर्व ५ अहवाल निगेटिव्ह आले.