स्पर्धेतून संशोधन येते उदयास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 10:24 PM2019-12-30T22:24:49+5:302019-12-30T22:25:55+5:30

प्र.कुलगुरु डॉ.पी.पी. माहुलीकर : साक्रीत जिल्हास्तरीय ‘अविष्कार’ स्पर्धेचे उद्घाटन

Research emerges from competition | स्पर्धेतून संशोधन येते उदयास

Dhule

Next

साक्री : उद्याचे भारताचे होऊ घातलेले शास्त्रज्ञ हे कुठेतरी दडलेले आहेत. त्यांचे नाव, संशोधन बाहेर येणे म्हणजे अविष्कार होय. हा प्रसंग महाविद्यालयीन युवकांसाठी जिद्द निर्माण करणारा व आपल्या बरोबरीच्या मित्र-मैत्रिणींच्या बुद्धी कौशल्यानुसार तयार केलेल्या संशोधनाचा हेवा वाटणारा आहे. हा प्रसंग म्हणजे भविष्यातील नोबल विजेते तयार करणारा पाया असल्याचे प्रतिपादन जळगाव विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पी.पी. माहुलीकर यांनी केले.
साक्री येथील सी.गो. पाटील महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या धुळे जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेचे उद्घाटन जळगाव विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.पी.पी. माहूलीकर यांच्याहस्ते झाले.

Web Title: Research emerges from competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे