मराठा समाजाला आरक्षण द्यावे- अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:35 AM2021-05-23T04:35:56+5:302021-05-23T04:35:56+5:30
निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात २६ जुलै १९०२ पासून आरक्षण देण्यास सुरुवात केली. डॉ. ...
निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात २६ जुलै १९०२ पासून आरक्षण देण्यास सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेच्या माध्यमातून आरक्षणाला कायद्याची चाैकट उपलब्ध करून दिली. घटनेला अनुसरुन तामिळनाडू, आंध्रप्रदेशमध्ये विधिमंडळात विशेष ठराव करून आरक्षण वाढवून घेतले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातदेखील मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष जगन ताकटे, शहराध्यक्ष विक्रमसिंह काळे, तालुकाध्यक्ष रमेश मराठे, जिल्हा संघटक बाजीराव खैरनार, खजिनदार सतीश गिरमकर, शहर सचिव पवन शिंदे, शहर संघटक आशिष देशमुख, धुळे तालुका संघटक मिलिंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष कांतिलाल देवरे, सल्लागार साहेबराव पाटील, प्रसिध्दीप्रमुख सुनील ठाणगे, राजेंद्र मराठे, उमेश पवार, विनोद पाटील, संजय नेतकर, ॲड. मधुमती ठाणगे, अश्विनी पवार, बाबासाहेब ठोंबरे आदी उपस्थित होते.