साक्री तालुक्यातील दोन मंडळात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:04 PM2019-01-12T12:04:07+5:302019-01-12T12:05:23+5:30

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव

A resolution to declare drought in two circles in Sakri taluka | साक्री तालुक्यातील दोन मंडळात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव

साक्री तालुक्यातील दोन मंडळात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव

Next
ठळक मुद्देगेल्यावर्षी जिल्ह्यात असमाधानकारक पाऊसउमरपाटा व कुडाशी या मंडळात भीषण पाणी टंचाईया दोन्ही मंडळात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव

आॅनलाइन लोकमत
धुळे : राज्य शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला. मात्र साक्री तालुक्यातील उमरपाटा व कुडाशी ही दोन महसूल मंडळे दुष्काळातून वगळण्यात आली आहे. मात्र या दोन्ही मंडळात पाणी, चारा टंचाई असून, यावर्षी कोणतेच पीक हाती आलेले नाही. त्यामुळे या मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव करण्याची मागणी करण्यात आली.   सभेत या दोन्ही मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव करण्यात आला. त्याचबरोबर सभेत रोहयोच्या वार्षिक आराखड्याचा विषय तूर्त स्थगित ठेवण्यात आला. 
जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांना मुदतवाढ मिळाल्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा  यशवंतराव चव्हाण सभागृहात  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात वरील ठराव करण्यात आला. व्गेल्यावर्षी झालेल्या अल्प पावसामुळे जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणी व टंचाई भेडसावू लागली होती. त्यामुळे शासनाने सुरवातीला धुळे व शिंदखेडा तालुक्यातच दुष्काळ जाहीर केला होता. मात्र शिरपूर व साक्री तालुक्यातही पाणी, चाºयाची  भीषण परिस्थिती असल्याने संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी सदस्यांनी केली होती. त्यानुसार शासनाने शिरपूर, साक्री तालुक्याचाही दुष्काळी तालुक्यात समावेश केला.मात्र साक्री तालुक्यातील कुडाशी व उमरपाटा ही दोन मंडळे वगळली होती. या दोन्ही मंडळात पाण्याची भीषण टंचाई  आहे. त्यामुळे या दोन मंडळात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव सर्वानुमते  करण्यात आला. 

 

Web Title: A resolution to declare drought in two circles in Sakri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.