सेवानिवृत्त प्राध्यापिकेकडे तीन लाखांची घरफोडी
By Admin | Published: February 3, 2017 12:55 AM2017-02-03T00:55:44+5:302017-02-03T00:55:44+5:30
क्षीरे कॉलनीतील घटना : रोख रकमेसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश
धुळे : देवपुरातील क्षीरे कॉलनीतील विधी महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिकेकडे घरफोडी करून चोरटय़ांनी रोख रकमेसह तीन लाखांचा ऐवज लंपास केला आह़े गुरुवारी सायंकाळी ही घटना लक्षात आली़ याप्रकरणी रात्री उशिरार्पयत पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होत़े
क्षीरे कॉलनीतील प्लॉट क्रमांक 40, श्री समर्थ कृपा येथे राहणा:या विधी महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना रमणलाल उपाध्ये (वय 62) या 22 जानेवारी रोजी बंगळुरू येथे मुलाकडे गेल्या होत्या़ घर बंद असल्याची संधी साधत चोरटय़ांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून घरातील कपाटातील रोख रकमेसह तीन ते साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल़े
मीना उपाध्ये या बाहेरगावाहून 2 फेबुवारी रोजी सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसून आल्याने चोरी झाल्याचे लक्षात आल़े त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली़ घटनास्थळी पोलीस अधीक्षक चैतन्या एस., पोलीस निरीक्षक प्रदीप पाडवी, पोलीस निरीक्षक देवीदास शेळके यांनी भेट देऊन पाहणी केली़ तसेच ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आल़े श्वानाने स्वामी समर्थ पेट्रोल पंपार्पयत माग दाखविला़
गोळीबारची चर्चा- क्षीरे कॉलनीत दरोडा पडल्याची व गोळीबार झाल्याची चर्चा होती़ त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली़