निवृत्त शिक्षकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:51 PM2018-12-16T17:51:40+5:302018-12-16T17:52:07+5:30

कुमारनगर : १ लाख १७ हजारांचा मुद्देमाल

In the retired teacher's house, the thieves screamed | निवृत्त शिक्षकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील साक्री रोडवरील कुमारनगरात राहणाºया निवृत्त शिक्षकाच्या घरी चोरट्याने डल्ला मारला़ रोकडसह दागिने असा एकूण १ लाख १७ हजाराचा मुद्देमाल घेऊन  पोबारा केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला़ 
शहरातील साक्री रोड, कुमारनगर ब्लॉक नंबर ओ/९, रुम नंबर ७, सेंट्रल बँकेजवळ रमेश विनायक पाटील यांचे निवासस्थान आहे़ ते निवृत्त शिक्षक आहेत़ त्यांचा एक मुलगा नितीन हा वर्धा येथे असून दुसरा मुलगा अमित हा नवापूर येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे़ रमेश पाटील आणि त्यांची पत्नी हिराबाई हे दोघे कुमारनगरातील घरात  राहतात़ दोन मजली घर असल्याने ते वरच्या मजल्यावर शनिवारी रात्री साडेबारा वाजेपर्यंत गप्पा मारत बसले होते़ त्यानंतर ते झोपले़ पहाटे १ ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान चोरट्याने त्यांचे तळमजल्यावरील घराचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला़ घरात ठेवलेले लोखंडी कपाट फोडले़ त्यात ठेवलेले ५० हजार रुपये किंमतीचा ५ तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार, २० हजार रुपये किंमतीचा २ तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस हार, ६ हजार ५०० रुपये किंमतीचा ६़५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ११ अंगठ्या आणि ४० हजार रुपये रोख रक्कम याशिवाय १ हजार रुपये किंमतीचे ४ जुने ड्रेस असा एकूण १ लाख १७ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला़ 
सकाळी ७ वाजेच्या सुमारास रमेश पाटील यांची पत्नी हिराबाई ही तळमजल्यावर आली असता तिला लाईट सुरु असल्याचे दिसले़ दरवाजाही उघडा दिसला़ तिने ही बाब नवºयाला सांगितली़ त्यांनी घरातील वस्तुंची तपासणी केली असता घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले़ घटनेची माहिती शहर पोलिसांना कळविण्यात आली़ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला़ याप्रकरणी रमेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला़ 

Web Title: In the retired teacher's house, the thieves screamed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे