धुळे येथे वाहन नोंदणीतून एकाच दिवसात 41 लाखांचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2017 05:12 PM2017-04-01T17:12:58+5:302017-04-01T17:12:58+5:30

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या नोंदणीतून 31 मार्च या एकाच दिवशी एकत्रित 41 लाखांचा घसघशीत महसूल मिळाला आह़े

Revenue of 41 lakhs in one day from the vehicle registration in Dhule | धुळे येथे वाहन नोंदणीतून एकाच दिवसात 41 लाखांचा महसूल

धुळे येथे वाहन नोंदणीतून एकाच दिवसात 41 लाखांचा महसूल

Next

धुळे, दि. 1 : दुचाकी आणि चार चाकी वाहनाच्या किंमतीत मोठी सवलत मिळाल्याने या वाहनांच्या विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली़ त्यामुळे धुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या नोंदणीतून 31 मार्च या एकाच दिवशी एकत्रित 41 लाखांचा घसघशीत महसूल मिळाला आह़े 
बीएस-3 इंजिन असलेल्या वाहनांवर घसगशीत सवलत मिळाल्याने त्यांची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी या नव्या को:या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी अक्षरश: झुंबड उडाली होती़
एरव्ही दुचाकी वाहनाची नोंद 80 ते 100 इतकी होत असत़े तीच नोंद 31 मार्च रोजी 450 ते 500 र्पयत पोहचली. या नोंदणीतून मिळणारे रोजचे उत्पन्न 3 लाख 25 हजारार्पयत असताना या एकाच दिवशी तेच उत्पन्न 21 लाखांवर गेले. हीच परिस्थिती चार चाकी वाहनांच्या बाबतीतही आह़े या प्रकारच्या 7 ते 8 वाहनांची रोज नोंद होत असत़े मात्र 31 मार्च रोजी 20 ते 22 वाहनांची नोंदणी करण्यात आली.  रोज सरासरी 5 लाखांचे उत्पन्न असताना मात्र या एका दिवसात ते उत्पन्न 20 लाखांवर जावून पोहचले आह़े
 

Web Title: Revenue of 41 lakhs in one day from the vehicle registration in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.