धुळ्य़ात महसूल विभागातर्फे 102 टक्के वसुली
By admin | Published: April 1, 2017 07:10 PM2017-04-01T19:10:26+5:302017-04-01T19:10:26+5:30
मार्चअखेर पूर्ण केले असून मूळ उद्दिष्टाच्या 102 टक्के वसुली झाली आहे. मार्च महिन्यात 10 कोटींनी उद्दिष्ट वाढवून देण्यात आले होते.
धुळे : जिल्हा महसूल विभागाने आपले विविध करवसुलीचे उद्दिष्ट मार्चअखेर पूर्ण केले असून मूळ उद्दिष्टाच्या 102 टक्के वसुली झाली आहे. मार्च महिन्यात 10 कोटींनी उद्दिष्ट वाढवून देण्यात आले होते. तेही पूर्ण करण्यात यश मिळाले आहे.
जिल्हा प्रशासनाला यंदा 46 कोटी 75 लाख 32 हजार रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. फेब्रुवारी अखेर्पयत त्यापैकी 40 कोटी 98 लाख 37 हजार म्हणजे जवळपास 41 कोटी रुपयांची (96.21 टक्के) वसुली झाली होती. या दरम्यान 10 कोटींचे वाढीव उद्दिष्ट देण्यात आले. त्यामुळे 46 कोटी 75 लाख 32 हजार रु.चे मूळ उद्दिष्ट व वाढीव 10 कोटी रुपये असे एकत्रित 56 कोटी 75 लाख 32 हजारांचे उद्दिष्ट करवसुलीतून साध्य करायचे होते. परंतु मार्च अखेर 58 कोटी 6 लाख 90 हजार रुपयांचा महसूल वसूल करण्यात यश आले.