एसटी कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्याचा निर्णय मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 09:01 PM2020-07-26T21:01:15+5:302020-07-26T21:01:32+5:30

वंचित बहुजन आघाडी : मुंबईत लाँगमार्च काढण्याचा इशारा

Reverse the decision to suspend the service of ST employees | एसटी कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्याचा निर्णय मागे घ्या

dhule

Next

धुळे : राज्य परिवहन महामंडळाच्या सन २०१९ च्या सरळसेवा भरतीमधील चालक तथा वाहक पदासाठी नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी करीत एसटी कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली़
वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली या कर्मचाºयांनी सोमवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले़ निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी एसटी महामंडळाने सरळसेवा भरतीद्वारे ८ हजार २२ पदे भरण्याचा निर्णय घेतला होता़ त्यात प्रत्यक्ष निवड यादीतील ४ हजार ५०० पात्र उमेदवारांपैकी १ हजार ३०० उमेदवारांना प्रशिक्षण देवून नियुक्त्या देण्यात आल्या़ तसेच ३ हजार २०० चालक तथा वाहक, १५० राज्य संवर्ग कर्मचारी आणि ८२ अधिकारी प्रशिक्षण घेत आहेत़
दरम्यान, रोजंदारी गट क्रमांक एकमध्ये नेमणूक दिलेल्या चालक तथा वाहक कर्मचाºयांची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे़ या निर्णयामुळे ४ हजार ५०० कर्मचाºयांना कोणताही दोष नसताना तात्पुरत्या स्वरुपात नोकºया गमवाव्या लागणार आहेत़ एसटी महामंडळाला कर्मचाºयांची आवश्यकता असताना केवळ कोरोनामुळे त्यांची सेवा स्थगित करुन कर्मचाºयांवर अन्याय केला जात आहे़
सदरचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा, सरळसेवा भरती अंतर्गत चालक तथा वाहक, सहायक, लिपिक टंकलेखक, राज्य संवर्ग व अधिकारी तसेच अनुकंपा तत्वावरील उमेदवारांचे प्रशिक्षण थांबविण्याचा निर्णय रद्द करावा आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत़ याबाबत आठ दिवसात निर्णय घेतला नाही तर मुंबईत लाँगमार्च काढण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे़

Web Title: Reverse the decision to suspend the service of ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे