अवधान शिवारातील हॉटेलवर रिव्हॉल्व्हर, लोखंडी रॉडचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 05:19 PM2019-03-04T17:19:30+5:302019-03-04T17:20:01+5:30
मोहाडी पोलीस : १३ जणांविरुध्द गुन्हा, घटनेमुळे परिसरात तणाव
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अवधान शिवारात एका हॉटेलवर शनिवारी रात्री रिव्हॉल्व्हर, लोखंडी रॉडसह तलवारी काढल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते़ छातीवर बंदूक रोखून तलवारीने वार करण्याचा प्रयत्न झाला़ मात्र, प्रसंगावधान राखत जीव वाचविल्याने दोघांना दुखापत झाली़ याप्रकरणी संशयित १३ जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला़
मोहाडी उपनगरात राहणाºया अजय विश्वास मरसाळे व किस्मतसिंग भादा यांच्यात पुर्वीपासून वाद आहे़ शनिवारी रात्री अजय मरसाळे हा अवधान शिवारात एका हॉटेलवर आला़ त्याचवेळेस काही जण त्या हॉटेलवर पोहचले़ त्यांनी मागील भांडणाची कुरापत काढून अजय मरसाळे याला मारहाण सुरु केली़ ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ यावेळी त्याचा मित्र धीरज राजेंद्र सोनार हा मध्यस्थी करण्यास धावला़ आलेल्यांपैकी एकाने तलवारीने मान छाटण्याचा प्रयत्न केला़ तर दुसºयाने पिस्तुल रोखून शिवीगाळ केली़ यावेळी धीरज सोनार याठिकाणी मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्यालाही जबर मारहाण करण्यात आली़ जीव वाचविण्यासाठी तो महामार्गाच्या पलिकडच्या दुकांनाकडे पळाला असता त्याच्या दिशेने लोखंडी रॉड फेकून मारल्याने त्यात तो जखमी झाला़ यावेळी त्याच्या खिशातील ३ हजार रुपये देखील बळजबरीने काढून घेण्यात आले़
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मोहाडी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली़ जखमी झालेल्या दोघांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर रविवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास अजय विश्वास मरसाळे (२४, रा़ पंजाबी कॉलनी, मोहाडी उपनगर, धुळे) याने मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, संशयित किस्मतसिंग भादा, मिलनसिंग भादा, कबीर विजय सोनवणे, गजानन उर्फ भोंद्या कोळी, राहुल उर्फ विक्की शरद कोळी, हेमंत संजू हाके, अतुल उर्फ काल्या कोळी, अक्षय संजू हाके, आबा वाडेकर, सुनील जाधव, गणेश उर्फ डमरू गण्या सोनवणे, करण सोनवणे आणि अजय (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात भादंवि कलम ३९७, ५०४ तसेच आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक डी़ एस़ मोरे घटनेचा तपास तपास करीत आहेत़