काळ्या बाजारात जाणारा तांदूळ भरदुपारी महामार्गावर पकडला

By देवेंद्र पाठक | Published: November 4, 2022 08:51 PM2022-11-04T20:51:43+5:302022-11-04T20:52:04+5:30

शहर उपअधीक्षकांची कारवाई, ५ लाखांच्या तांदुळ जप्त

rice going to Black market caught on Bhardupari highway by dhule police | काळ्या बाजारात जाणारा तांदूळ भरदुपारी महामार्गावर पकडला

काळ्या बाजारात जाणारा तांदूळ भरदुपारी महामार्गावर पकडला

googlenewsNext

धुळे : चाळीसगाव चाैफुलीमार्गे गुजरातच्या दिशेने जाणारा रेशनिंगचा तांदळाचा ट्रक उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, वाहतूक शाखा व पोलिसांनी सापळा लावून पकडला. ही कारवाई शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास झाली. पोलिसांनी ४ लाख ८२ हजाराचा तांदूळ आणि १४ लाखांचा ट्रक असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालकाला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. चाैकशी सुरु आहे.

माजलगाव (जि. बीड) येथून एमएच २३ डब्ल्यू ३४९५ क्रमांकाचा ट्रक गुजरातच्या दिशेने निघाला. त्यात रेशनिंगचा तांदुळ असून तो काळ्या बाजारात विकला जाणार असल्याची माहिती उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांना मिळाली. माहिती मिळताच दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चाळीसगाव चाैफुलीवर दुपारी सापळा लावण्यात आला. ट्रक येताच तो अडविण्यात आला. चालकाकडे विचारणा केल्यावर उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने तांदळासह ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.

४ लाख ८२ हजार ५८० रुपयांचा तांदुळ आणि १४ लाखांचा ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ट्रक चालक बंडू आश्रूबा घोलप (वय ५५, रा. बीड) याला ताब्यात घेण्यात आले असून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली. पुरवठा निरीक्षकांना कळविण्यात आले असून पुढील चाैकशी सुरु आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक संगिता रारऊत, उपअधीक्षक कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मांडेकर यांच्यासह कर्मचारी आरीफ शेख, जितेंद्र आखाडे, भागवंत पाटील, सुनील कुलकर्णी, कबीर शेख, रमेश उघडे, सुनील शेंडे, पाटील, चाैरे यांनी ही कारवाई केली.

Web Title: rice going to Black market caught on Bhardupari highway by dhule police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे