दंगेखोरांची गय नाही, प्रशासन मुळार्पयत पोहोचणार
By admin | Published: January 26, 2016 12:38 AM2016-01-26T00:38:15+5:302016-01-26T00:38:15+5:30
नंदुरबार : गाव, शहर अशांत करून आणि बंद पुकारून लोकांना वेठीस धरू नका.
नंदुरबार : गाव, शहर अशांत करून आणि बंद पुकारून लोकांना वेठीस धरू नका. मूठभर लोक जिल्ह्यातील शांतता बिघडविण्याचे काम करीत असल्याने त्यांच्या मुळार्पयत पोहचून पडद्यामागचे चेहरे प्रशासन उघड करेल आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली असल्याचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी सोमवारी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत सांगितले. गेल्या दोन आठवडय़ातील घटनांच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश घुर्ये यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत सदस्यांनी पोलिस व जनतेत संवाद नसल्याचा आरोप डॉ.मतीन शेख यांनी केला. देवेंद्र जैन यांनी व्यापा:यांना जबरदस्तीने बंद करण्यास काही लोक भाग पाडतात, असा आरोप केला. तोच धागा पुढे पकडत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पोलिसांनी अशा लोकांवर कठोर कारवाई करावी, असे सांगत पोलिसांच्या नरमाईच्या भूमिकेवर टोलेबाजी केली. ते म्हणाले, शहरात पोलिसांचा धाक राहिला नाही, म्हणूनच विघातक शक्तींना बळ मिळत आहे. अगदी पोलीस ठाण्यात येऊन लोक पोलीस अधिका:यांची कॉलर धरतात. अशा घटना दुर्दैवी आहेत. पोलिसांनी कठोर व्हावे, अशी सूचना करीत त्यांनी शहरातील फलकांबाबत पालिकेची भूमिका मांडली. यापुढे जर सर्वाची इच्छा असेल तर कुणालाही फलक लावण्यास परवानगी देणार नाही. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी परवानगीच देवू नये असे ठामपणे सांगत फलक लावणा:यांवर यापुढे प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले. पोलिसांवर त्यांनीही आरोप करीत आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन केले. पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिलाच पाहिजे; पण त्याचे रक्षकच कर्तव्य विसरत असल्याचे त्यांनी सांगितले. शांतता समितीतील प्रत्येक सदस्याने जर आपापल्या गल्लीतही शांतता ठेवण्यासाठी प्रय} केल्यास दंगे होणारच नाही. यापुढे पालिका व प्रशासनानेही प्रत्येक दुकानाला आणि कॉलनींना परवानगी देताना सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करावे, शिवाय प्रशासनानेही पुढाकार घेऊन या योजनेला गती द्यावी, असे सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश घुर्ये यांनी पोलीस आपले काम चोख बजावत आहे. यापुढे काही चुका असल्यास त्या दूर करून अधिक जोमाने काम करू, पण त्यासाठी जनतेचेही सहकार्य असावे. प्रत्येक दंगलीत जखमी होणारा पोलीसच असतो. लोकांचे रक्षण करण्यासाठी तो स्वत: आपल्या अंगावर दगडांचा मार ङोलतो. दगड मारणारा एकच असतो; पण 99 जण ते पाहात असतात. त्यामुळे 99 जणांनी त्या एकाचा हात रोखल्यास दंगलच होणार नाही, असे सांगितले.या वेळी समितीतील अनेक सदस्यांनी आपली मते मांडली.