पांझरेचा महापुर ओसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 10:17 PM2019-08-11T22:17:18+5:302019-08-11T22:18:15+5:30

पंचनामे सुरू : नदीकाठावरील रस्ते खचले, पुलांची झाली दुरावस्था, घरांची मोठी नुकसान

The river is flooded | पांझरेचा महापुर ओसरतोय

dhule

Next

धुळे : साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यात झालेला मुसळधार पावसामुळे या भागातील लहान-मोठी धरणे ओव्हर फ्लो झाल्याने ‘पांझरा’ला शुक्रवारी महापुर आला होता़ पुराच्या पाण्याने नदीकाठावरील नागरिकांचे कुटूंब उघड्यावर आले आहे़ शनिवारी पुर ओसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असुन प्रशासनाने ६ हजार १० नागरिकांचा नुकसानीचा पंचनामा केला आहे .
६ हजार नुकसानीचे पंचनामे
पांझरा नदीला आलेल्या पुराने जिल्ह्यातील पांझरा नदीकठावरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ त्यासाठी महसुल व मनपा कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे़ ९ रोजी झालेल्या नुकसानीचे ६ हजार १० नागरिकांचे पंचनामे झाले आहे़ त्यात धुळे ग्रामीण ४०५, साक्री १ हजार १६३, शिंदखेडा १७०, शिरपूर १ हजार ७०० धुळे शहर २८२, पिंपळनेर १ हजार ९५, दोंडाईचा १ हजार १९५ असे एकून ६ हजार १० नागरिकांचे पंचनामे झाले आहेत़ साक्री व दोंडाईचा येथील दोघे जखमी झाले आहे़ तर शिरपूर १, पिंपळनेर २ अशा तिंघाचा मृत्यू झाला आहे़ पुर अतिवृष्टीत २५ जणावरांचा मृत्यू तर २१४ लहान जणावरांचा मृत्यू झाला आहे़
४२ व्यवसायिकांचे नुकसान
पांझरा नदीला महापुर साक्री शहरातील ४२ व्यवसायिकांच्या दुकानात पाणी शिरल होते़ त्यामुळे त्यांच्या दुकानातील साहित्य या पाण्यात वाहून अन्य नुकसान झाले आहे़ दरम्यान पिंपळनेर येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत कांदा साठवला होता़ अचानक पुराचे पाणी चाळीत गेल्याने १५ शेतकºयांचे नुकसान झाले आहे़
५ गावातील २८२ घरांचे नुकसान
पांझरा नदीकाठावरील मनपा हद्दीत नव्याने समाविष्ठ झाल्याने पाच गावातील २८२ घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे़ त्यामध्ये धुळे शहरातील ६०, देवपूर व वलवाडी भागातील १७१, महिंदळे ४१, मोराणे प्ऱल़ २, नकाणे ८, अशा पाच गावातील २८२ गावांचे नुकसान झाले आहे़ महसुल विभागाकडून शनिवारी नुकसानग्रस्त गावांचा पंचनामा करण्यात आला़
नदीपात्राची स्वच्छता
लहान पूल व श्री एकविरा देवी मंदिराजवळ पूल पाण्याखाली गेल्याने त्या भागातील वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली असून जुने धुळे तसेच मोगलाई गवळीवाडा व नकाणे रोड वरील आंबेडकर नगर वसाहतीमध्ये पाणी शिरले होते. या भागात मनपा स्वच्छता विभागाच्या कर्मचाºयांकडून स्वच्छता केली जात आहे़
पांझरा नदीला आहेर
पांझरा नदीला आलेल्या महापूर जिवहाणी झाली नाही, म्हणून जिल्हा शिवसेनेच्यावतीन पांझरा नदीची जलपूजन करून पांझरा मातेचे आभार मानले आहेर अर्पण करण्यात आला़ शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, पंकज गोरे, धीरज पाटील, राजु पाटील, नरेंद्र परदेशी, डॉ. सुशील महाजन, गुलाब माळी, प्रफुल पाटील आदी उपस्थित होते़
रस्त्यासह पुलाचे नुकसान
नदीला पुर आल्याने पुलावरील वाहतुक बंद केली होती़ पुराचे पाण्यामुळे नदीकाठावरील रस्ते खचले आहे़ तर पथदिवे बंद पडले आहे़ तर काही ठिकाणी रस्ता बंद पडला आहे़ नदीपात्रात घान जमा झाल्याने जेसीबी व स्वच्छता कर्मचाºयांकडून पाण्याचा साचलेली घाण काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात येत आहे़

Web Title: The river is flooded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे