रस्ता दुरूस्तीसाठी धुळे जिल्ह्यातील दहिवेल फाटा येथे भाजपतर्फे रस्तारोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:43 AM2020-09-30T11:43:10+5:302020-09-30T11:43:36+5:30
घोषणांनी परिसर दणाणला, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
आॅनलाइन लोकमत
साक्री साक्री तालुक्यातून जाणार राज्य महामार्ग क्रमांक ७ वरील छडवेल कोर्डे ते दहिवेल दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हा रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्ता दुरूस्त करावा या मागणीसाठी भाजपतर्फे आज दुपारी दहिवेल फाट्याजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सुमारे एकतास केलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यास निवेदन देण्यात आले.
साक्री तालुक्यातून जाणारा प्रकाशा ते नासिक हा राजमार्ग क्रमांक ७ वर छडवेल कोर्डे ते दहीवेल दरम्यानच्या सुमारे २३ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून दोन अडीच फूट खोल तर पाच ते सात फूट रुंदीचे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे तीन जणांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. त्याबाबत संबंधित विभागातील अधिकाº्यांना तोंडी सूचना अनेक वेळा देण्यात आल्या. मात्र त्याची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे आज साक्री तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यशासनाच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन केले. दहिवेल फाटा या ठिकाणी एकतास रस्ता रोको आंदोलन केल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी रस्ता त्वरित दुरुस्त व्हावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बिरारीस यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची तात्काळ दखल घेतली नाही तर या राज्यमार्गावरील खड्यांमध्ये लगेच झाडे लावा आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला होता. आंदोलनाप्रसंगी पिंपळनेर मंडळाचे भाजपचे अध्यक्ष मोहन सूर्यवंशी, वसंतराव बच्छाव, भाजपचे धुळे जिल्ह सरचिटणीस शैलेंद्र आजगे, दत्तू बोरसे, संदीप माळी, रवींद्र चौधरी, प्रवीण देसले, कन्हैय्यालाल माळी, खंडू कुवर, रामलाल जगताप, रावसाहेब खैरनार, केशवराव पाटील, बाबा पाटील, रामदास पाटील, बाबा माळी, हेमंत बच्छाव, रमेश मालचे, प्रवीण राऊत, धनंजय घरटे, रामकृष्ण एखंडे, कोमल जैन, हिराबाई सोनवणे, सुनील माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.