शहरातील रस्ते ‘एलईडी'ने झळाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:50 PM2019-01-04T22:50:01+5:302019-01-04T23:13:11+5:30

निर्णयाची अंमलबजावणी: पथदिव्यासाठी होणार सर्वेक्षण

Road lights in the city will get reflected in 'LED' | शहरातील रस्ते ‘एलईडी'ने झळाळणार

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महानगर पालिका हद्दीतील ्नरस्त्यांवर ‘एलईडी' पथदिवे बसविण्याबाबत राज्यातील महापालिकांनी शासन निर्णयानुसार एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई या कंपनीशी करार करून शहरातील रस्त्यावर एलईडी पथदिवे बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लवकरच शहरातील रस्ते एलईडी पथदिव्याने झळाळणार असल्याची माहीती सुत्रांनी दिली़
महानगरपालिका हद्दीत मुंबई येथील एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून एलईडी' पथदिवे बसविण्याच्या आदेश शासन निर्णय १२ जानेवारी व ६ जुन रोजी घेण्यात आला होता. तसेच याबाबत कार्यादेश देखील काढण्यात आले आहेत. एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीमार्फेत पथदिवे बसविण्यात येत आहे़
शहरातील रस्त्यांची होणार पथदिव्यांसाठी पाहणी विजेची बचत होण्यासाठभ राज्यातील महापालिका, नगर पंचायतीसह, ग्रामपंचायतींना राज्यशासनातर्फे अनुदान देण्यात येत आहे़ पथदिवे बसविण्यासाठी पथदिव्यासाठी सर्व्हेचे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत़ दरम्यान एलईडी पथदिवे बसविण्यास विजेची बचत, खांबावर असलेले पथदिवे दुरुस्ती होऊ शकते़
मनपाचा खर्च होणार कमी
महानगरपालिकेच्या हद्दीत सद्याच्या स्थितीत असलेले पथदिवे ेजुने आहेत़ त्यामुळे महापालिकेला दुरुस्ती-देखभाल व वीज बिलापोटी महिन्याला लाखोे रुपये खर्च येतो़ दरम्यान पथदिव्यांवर एलईडी बल्ब बसविल्यास ५० टक्के खर्च कमी होणार आहे. त्यामुळे बचत झालेला खर्च एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, कंपनीला देण्याचा करारानुसार देखभाल- दुरुस्तीला दिला जाणार आहे. या निर्णयामुळे महापालिकेचा विजेचा खर्च कमी करता येवू शकणार आहे.
शहरातील १३ हजार ७०० पथदिव्यांची व्यवस्था
शहरात रस्ते, चौक, कॉलणी परिसरातील बरेच पथदिवे जुने व बंद पडलेले आहे़ त्यामुळे नागरिकांना वारवांर समस्यांना सामोेरे जावे लागते़ नवीन वर्षात शहरातील ११ हजार ७०० खांबावर एलईडी पथदिवे बसविण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे़ त्यातील सध्या दोन हजार पथदिवे ‘एलईडी' आहेत़

Web Title: Road lights in the city will get reflected in 'LED'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे