साक्री-पिंपळनेर रस्त्यावर ‘रास्ता रोको’
By admin | Published: January 10, 2017 11:46 PM2017-01-10T23:46:39+5:302017-01-10T23:46:39+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापा:यांनी कांद्याचे भाव पाडल्याने संतप्त शेतक:यांनी उद्घाटनानंतर लगेचच साक्री-पिंपळनेर रस्त्यावर ‘रास्ता रोको’ करीत संताप व्यक्त केला.
साक्री : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांदा खरेदी उद्घाटनाच्या दिवशीच व्यापा:यांनी कांद्याचे भाव पाडल्याने संतप्त शेतक:यांनी उद्घाटनानंतर लगेचच साक्री-पिंपळनेर रस्त्यावर ‘रास्ता रोको’ करीत संताप व्यक्त केला. अखेर साक्री पोलिसांनी हस्तक्षेप केला. शेतक:यांना विश्वासात घेऊन प्रती क्विंटल 40 रुपये भाव वाढवून दिले. त्यानंतर शेतक:यांनी आंदोलन मागे घेतले.
उन्हाळी कांदा मातीमोल झाल्याने शेतकरी अगोदरच संकटात सापडला आहेत. त्यानंतर पावसाळी कांदा विक्रीसाठी शेतक:यांना सोयीचे व्हावे, म्हणून साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांदा खरेदी केंद्राचे उद्घाटन ठेवण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यातील शेतक:यांनी पहिल्या दिवशी मोठय़ा प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता. उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर व्यापा:यांनी कांदा खरेदीला सुरुवात केली. परंतु, बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दर व्यापा:यांनी पुकारल्याने शेतक:यांनी संताप व्यक्त केला. सर्व संतप्त शेतक:यांनी मार्केटच्या बाहेर सर्व वाहने आणून ‘साक्री पिंपळनेर’ रस्त्यावर रास्ता जाम केला.
याबाबत साक्री पोलिसांना माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शेतकरी व व्यापारी यांची बैठक घेऊन प्रती क्विंटलमागे भाव वाढवून दिले. चांगल्या प्रतीच्या कांद्याला कमाल 100 ते किमान 500 रुपये प्रती क्विंटल भाव देण्यात आला. परंतु, इतर मार्केटमध्ये जास्त दर मिळत असल्याने शेतकरी अधिकच संतापले होते. शेतक:यांच्या प्रश्नावर आंदोलन छेडणारे नेते मात्र, शेतक:यांच्या पाठीशी धावून न आल्याने शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, शेतक:यांच्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता़
मंगळवारी कांदा खरेदी केंद्राचे उद्घाटन नियोजित होते. परंतु, सभापती व इतर संचालक उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गैरहजर होते. त्यामुळे इतर संचालकांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम उरकण्यात आला. सभापती पोपटराव सोनवणे हे नोटाबंदीच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर दिल्ली येथे गेल्याचे समजले आहे. दरम्यान, अर्धा तास आंदोलन सुरू असल्यामुळे साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.