तऱ्हाडी ते अभाणपूर या रस्ता दहा वर्षांपासून र्दुलक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:33 AM2021-05-22T04:33:30+5:302021-05-22T04:33:30+5:30

तऱ्हाडी ते अभाणपूर हे सात किलोमीटरचे अंतर आहे. मात्र या रस्त्याची अगदी दुरवस्था झाली आहे. हा रस्ता जिल्हा परिषद ...

The road from Tarhadi to Abhanpur has been neglected for ten years | तऱ्हाडी ते अभाणपूर या रस्ता दहा वर्षांपासून र्दुलक्षित

तऱ्हाडी ते अभाणपूर या रस्ता दहा वर्षांपासून र्दुलक्षित

Next

तऱ्हाडी ते अभाणपूर हे सात किलोमीटरचे अंतर आहे. मात्र या रस्त्याची अगदी दुरवस्था झाली आहे. हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येतो. दहा वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षित झालेला आहे. या रस्त्यावर तऱ्हाडी अभाणपूर या शिवारात शेतकऱ्यांची शेतजमीन असून या मार्गाचा ते वापर करीत असतात. परंतु रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे असल्याने रस्ता पूर्णपणे झाकला गेला आहे. त्यामुळे अवजड वाहने व बैलगाडी नेतांना चालकांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांनी केली आहे.

तऱ्हाडी ते अभाणपूर या रस्ता दहा वर्षांपासून दुर्लक्षित

तऱ्हाडी :- तऱ्हाडी ते अभाणपूर या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली असून, रस्त्यावरून वाहन नेतांना चालकांना कसरत करावी लागत आहे. हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

तऱ्हाडी ते अभाणपूर हे सात किलोमीटरचे अंतर आहे.मात्र या रस्त्याची अगदी दुरवस्था झाली आहे. हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येतो. दहा वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षित झालेला आहे. या रस्त्यावर तऱ्हाडी अभाणपूर या शिवारात शेतकऱ्यांची शेतजमीन असून या मार्गाचा ते वापर करीत असतात. परंतु रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे असल्याने रस्ता पूर्णपणे झाकला गेला आहे. त्यामुळे अवजड वाहने व बैलगाडी नेतांना चालकांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांनी केली आहे.

Web Title: The road from Tarhadi to Abhanpur has been neglected for ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.