जिल्ह्यात 14 कोटींवर होणार रस्त्यांची कामे!
By admin | Published: April 24, 2017 11:52 PM2017-04-24T23:52:01+5:302017-04-24T23:52:01+5:30
जिल्हा परिषद : बांधकाम विभागामार्फत लवकरच ई-निविदा निघणार, सततची ओरड थांबणार
धुळे : जिल्ह्यात चारही तालुक्यात रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आह़े त्यासाठी कामेदेखील निश्चित झाली असून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला 14 कोटी 53 लाखांचा खर्च अपेक्षित आह़े ई-निविदेच्या माध्यमातून या कामाला प्रारंभ केला जाणार आह़े दरम्यान, ई-निविदेच्या कामांची लगबग सध्या बांधकाम विभागात सुरू झाली आह़े
धुळे तालुक्यात 32 ठिकाणी ही कामे मार्गी लावली जाणार आहेत़ त्यात प्रामुख्याने मेहेरगाव ते बोरीस मोराणे गोंदूर बायपास ते वार रस्ता, मेहेरगाव ते निकुंभे, धाडरे ते कुळथे, कुसुंबा ते मेहेरगाव, चिंचखेडे ते बाबरे, दह्याणे ते सांजोरी, कुंडाणे ते बोदगाव, मेहेरगाव ते कुसुंबा, राज्य मार्ग 6 ते मोराणे रस्ता, मोहाडी मोघण ते तिखी, लळींग ते तिखी, राष्ट्रीय महामार्ग ते हरण्यामाळ, राष्ट्रीय महामार्ग 3 रानमळा ते राष्ट्रीय महामार्ग 211र्पयतचा रस्ता, दापूर-धनूर-कापडणे-धमाणे-नगाव बुद्रूक रस्ता, राष्ट्रीय महामार्ग 6 ते उडाणे रस्ता, आर्वी ते अनकवाडी, सातरणे ते विश्वनाथ रस्ता, वडगाव ते शिरधाणे रस्ता, वडणे फाटा ते वडणे रस्ता, रावेर ते नंदाभवानी मंदिर, कापडणे ते सरवड रस्ता, सोनगीर ते नंदाणे रस्ता, सडगाव ते पाडळदे रस्ता, सोनगीर ते वडणे, वडणे फाटा ते वडणे, कापडणे ते न्याहळोद, बल्हाणे ते उडाणे, उडाणे ते खेडे, नंदाभवानी ते रावेर, मोहाडी प्ऱ डांगरी ते जवखेडा आणि सोनेवाडी फाटा ते अनकवाडी या रस्त्यांची कामे आहेत़ त्यासाठी ई-निविदा काढली जाणार आह़े
साक्री तालुक्यात 15 ठिकाणी ही कामे मार्गी लावली जाणार आहेत़ त्यात प्रामुख्याने अक्कलपाडा ते राष्ट्रीय महामार्ग 6, धाडणे ते सूरपान, म्हसदी ते काळगाव, कासारे ते दारखेल, कोकले ते नांदवण, कासारे ते गणेशपूर व सायने ते गणेशपूर त्यालाच दिघावेर्पयतचा जोडरस्ता, उभरांडी ते निजामपूर, भामेर ते निजामपूर, हट्टी बुद्रूक ते लोणखेडी, धमणार अॅप्रोच ते वसमार व नाडसे ते कोकले, कढरे ते आगरपाडा, इंदवे ते खर्दे आणि दुसाने ते छावडीर्पयतचा रस्ता असे विविध रस्त्यांची कामे मार्गी लावली जाणार आहेत.
शिंदखेडा तालुक्यात 25 ठिकाणी ही कामे मार्गी लावली जाणार आहेत़ त्यात प्रामुख्याने बाभुळदे ते धांदरणे, वरसूस सोनेवाडी, अक्कडसे रस्ता, सुलवाडे ते सुलवाडे फाटा, दाऊळ रस्ता, रहिमपुरे ते विखरण, भडणे ते मेथी रस्ता, रामी ते दोंडाईचा रस्ता, नरडाणा ते मेलाणे रस्ता, साहूर ते जुने कोळदे रस्ता, पढावद ते पढावद फाटा, पिंपरखेडा ते वायपूर रस्ता, अंजनविहिरे ते वरझडी रस्ता, मांडळ ते विखरण, दरखेडा ते चिमठाणा, वर्षी ते दभाषी, चांदगड ते खलाणे, आमराळे ते रोहाणे, होळ ते दसवेल, सवाई मुकटी ते निकुंभे, पाष्टे ते कमखेडा, डोंगरगाव ते भादेश्वर, कमखेडा ते वारुड, जातोडा फाटा ते जातोडा, पिंपरखेडा ते विटाई रस्ता अशा विविध रस्त्यांचा समावेश करण्यात आलेला आह़े
शिरपूर तालुक्यात 15 ठिकाणी ही कामे मार्गी लावली जाणार आहेत़ त्यात प्रामुख्याने शिरपूर शिंगावे ते जातोडा, वरूळ ते लोंढरे, रुदावली ते टेंभे, मांडळ रस्ता, अजंदे ते कळमसरे, राष्ट्रीय महामार्ग 3 ते गरताड रस्ता, राष्ट्रीय महामार्ग 3 ते कुरखळी रस्ता, गरताड ते ताजपुरी, अजनाड भाटपुरा जापोरा रस्ता, बुडकी रस्ता, वाठोडा रस्ता, थाळनेर ते भोरखेडा रस्ता दोन वेगवेगळ्या टप्प्यात दुरुस्तीची कामे करणे, थाळनेर ते ताजपुरी, थाळनेर ते अहिल्यापूर, जैतपूर रस्ता अशा काही रस्त्यांची कामे मार्गी लावली जाणार आह़े
वेळोवेळी होणा:या जिल्हा परिषदेच्या बैठकांमधून ग्रामीण रस्त्यांचा विषय चर्चेत येत असतो़ त्या अनुषंगाने ई-निविदेच्या माध्यमातून कामे मार्गी लावण्यात यावी यासाठी अध्यक्ष शिवाजी दहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता़
सदरहू रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन मंडळांकडून निधी प्राप्त होणार असल्याचे कार्यकारी अभियंता वाय़ एस़ बि:हाडे यांनी सांगितल़े