कॉलन्यांचे रस्ते बंद, अत्यावश्यक सेवकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 09:05 PM2020-04-23T21:05:49+5:302020-04-23T21:06:32+5:30

लॉकडाउनचा फज्जा : रस्ते बंद करणारेच करताहेत गर्दी, दिवसा क्रिकेट, रात्री बॅडमिंटन, महिला-पुरूषांचे घोळके, शतपावली थांबेना

Roads to the colonies closed, harassing essential servants | कॉलन्यांचे रस्ते बंद, अत्यावश्यक सेवकांना त्रास

कॉलन्यांचे रस्ते बंद, अत्यावश्यक सेवकांना त्रास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील काही कॉलन्यांमधील रस्ते विनापरवानगी बेकायदेशिररित्या बंद करण्यात आले आहेत़ यामुळे अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे़ जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडणाºया नागरीकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे़ प्रशासनाने हे रस्ते त्वरीत सुरू करावेत, अशी मागणी होत आहे़
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन करुन गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे़ दरम्यान, धुळे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे भिती निर्माण झाली आहे़ नागरीकांनी अधिक खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे आणि ते योग्यही आहे़
परंतु कॉलनी परिसरासह इतरही भागांमध्ये मात्र काही नागरीकांनी खबरदारीचा आततायीपणा सुरु केल्याची माहिती समोर आली आहे़ प्रशासनाचे कोणतेही आदेश नसताना विनापरवानगी बेकायदेशिरपणे गल्लीबोळातले आणि कॉलन्यांमधील रस्ते बंद करण्यात आले आहेत़
सेवेतील अधिकारी
कर्मचाऱ्यांची गैरसोय
या रस्त्यांवरुन नेहमी घराकडे जाणाºया किंवा कार्यालयात जाणाºया अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, नर्स, पोलीस, मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, अग्नीशमन दल, रुग्णवाहिका चालक, कर्मचारी यांची गैरसोय होत आहे़
जीवनावश्यक वस्तुंच्या
वाहतुकीलाही अडथळा
एवढेच नव्हे तर भाजीपाला, दूध विक्रेते, किरणा दुकानदार, किराणा दुकानावर जीवनावश्यक माल पोहोचविणारी वाहने, गॅस सिलींडर पुरविणारी वाहने, घंटागाड्या, जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी बाहेर पडणारे नागरीक, दवाखान्यात तसेच औषधे खरेदीसाठी जाणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक अशा सर्व घटकांना त्याचा फटका बसतो आहे़
कार्यक्षमतेवर परिणाम
रस्ता बंद असल्यामुळे इतर रस्त्यांचा शोध घेत मोठा फेरा मारुन यांना घर गाठावे लागते किंवा कार्यालयाकडे जावे लागते़ यामुळे या सर्व घटकांची गैरसोय होत आहे, मानसिक त्रास होत आहे, कार्यालयात जाण्यास उशिर होत आहे आणि पर्यायाने त्यांच्या कार्यक्षमतेवर देखील परिणाम होत आहे़ जीवनावश्यक वस्तुंच्या उपलब्धतेवरही विपरीत परिणाम होत आहे़
अचानक रस्ते बंद
रात्री परतणाºयांची गैरसोय
कॉलनी परिसरातील रस्ते अचानक बंद होत आहेत़ सकाळी नेहमीप्रमाणे कार्यालयात गेलेला कर्मचारी, नर्स, डॉक्टर किंवा पोलिस ज्या रस्त्याने जातो तो नेहमीचा रस्ता रात्री बंद असतो़ अशावेळी अत्यावश्यक सेवा बजावून रात्री उशिरा घरी परतणाºया आरोग्य सेवक आणि पोलिसांची मोठी गैरसोय होत आहे़ रात्रीच्या वेळेला त्यांना इतर रस्त्यांचा शोध घेत मोठा फेरा मारुन घर गाठावे लागते़
वलवाडी गाव चौफेर बंद
मुख्य रस्त्यांची वाहतूक रोखली
वलवाडी गावाचे रस्ते सायंकाळनंतर चौफेर बंद करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू झाले आहेत़ वलवाडी गावाच्या पलीकडे चावरा शाळेजवळ मोठा कॉलनी परिसर आहे़ या कॉलन्यांमधील नागरीकांना ये जा करण्यासाठी वलवाडी गावातील रस्त्यांचा तसेच आजुबाजुच्या रस्त्यांचा वापर करावा लागतो़ परंतु सर्वच रस्त बंद झाल्याने कॉलनीतील घर गाठण्यासाठी मोठा फेरा मारुन जावे लागते़ धक्कादायक बाब म्हणजे वलवाडीतून नकाणे रोडला येण्यासाठी डीपी रोड आहे़ हा मुख्य रस्ता देखील बंद करण्यात आला आहे़ त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाºया वाहनांना अन्य रस्त्यांचा शोध घेत जावे लागते़
काही परिसरांमध्ये दिवसभर रस्ते मोकळे असतात़ सायंकाळनंतर रस्ते बंद केले जातात़ यातुन संबंधित नागरीकांना काय अपेक्षीत आहे हेच कळत नाही असा प्रश्न काही सुज्ञ नागरीकांनी उपस्थित केला आहे़
मुळात विना परवानगी रस्ते बंद करणे बेकायदेशिर आहे़ असे असले तरी कोरोनामुळे धुळे शहरात कॉलनी परीसरच नव्हे तर गल्लीबोळात देखील अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्याचे प्रकार घडत आहेत़ यामुळे एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ रात्री अपरात्री कुणाची अचानक तब्येत बिघडली तर रुग्णवाहिकेला येण्यास उशिर होवू शकतो़ त्यातून रुग्ण दगावण्याचो धोका संभवू शकतो़ कुठे आग लागली तर अग्नीशमन दलाचा बंब वेळेवर पोहोचू शकत नाही़ असे अनेक गंभीर प्रकार घडू शकतात़
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे़ परंतु रस्ते बंद करणे हा पर्याय होवू शकत नाही़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजन सुरू आहेत़ ज्या भागात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळतो तो भाग प्रशासनाकडून सिल केला जातो़ त्यामुळे नागरीकांनी परस्पर रस्ते बंद करण्याचा निर्णय घेणे चुकीचे आहे़ गर्दी टाळावी, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, नेहमी मास्क वापरावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे़ नेमके तेच होताना दिसत नाही़ त्यामुळे शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे़ नागरीकांना अजुनही गांभीर्याची जाणीव झालेली नाही़ रात्री शतपावली करण्यासाठी कॉलन्यांमध्ये गर्दी कायम आहे़
मध्यरात्री पोलीस कर्मचाºयाची पंचाईत
धुळे शहरात तिरंगा चौकात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर वलवाडी गावातील सर्व रस्ते सायंकाळनंतर बंद करण्यात आले होते़ दरम्यान, एक पोलिस कर्मचारी सेवा बजावून रात्री उशिरा घरी जाण्यासाठी निघाले़ त्यांचे घर वलवाडीच्या मागे कॉलनी परिसरात आहे़ परंतु गावकºयांनी रस्ते बंद केले होते़ मंदिराच्या बाजुचा एक रस्ता सुरू होता़ या रस्त्याने ते गावात शिरले़ परंतु गावाच्या शेवटच्या टोकावरचा एकमेव रस्ता देखील बंद करण्यात आला होता़ त्यामुळे त्यांना पुन्हा वाडीभोकर रस्त्यावर परत यावे लागले़ तेथून पेट्रोल पंपाच्या बाजुच्या रस्त्याने ते डीपी रोडला आले़ चावरा शाळेकडे जाणाºया रस्त्याने त्यांनी घर गाठले़ दिवसभर दमून थकून आलेल्या या पोलिस कर्मचाºयाला दोन किलोमीटरचा फेरा मारावा लागला़ शिवाय रस्ते शोधण्यात किमान पाउण तास वाया गेला़
कॉलन्यांमध्ये लॉकडाउनचा फज्जा
कॉलन्यांमध्ये लॉकडाउनचा फज्जा उडालेला आहे़ गर्दी टाळण्यासाठी रस्ते बंद करायचे आणि स्वत: कॉलन्यांमध्ये गर्दी करुन गप्पांच्या मैफिली रंगवायच्या असे अजब प्रकार सध्या कॉलन्यांमधील सुज्ञ रहिवाशांनी सुरू केले आहेत़ दिवसा क्रिकेट आणि रात्री बॅडमिंटनचे खेळ सुरू आहेत़ खेळण्यासाठी लहान मुलांची रात्री रस्त्यांवर गर्दी दिसत आहे़ एकीकडे मुले खेळतात तर दुसरीकडे त्यांचे आई, वडील, शेजारी राहणारे लोकांशी चौकात घोळका करुन गप्पांच्या मैफिली रंगवतात़ सायंकाळी फिरणाºयांनी कॉलनी परिसरातले रस्ते गजबजलेले आहेत़ जेवणानंतर रात्रीची शतपावली देखील वाढली आहे़ रात्री नऊनंतर अकरा वाजेपर्यंत घराघरातील कपल शतपावलीसाठी बाहेर पडतात़ सोबत लहान मुलेही असतात़ त्यामुळे गर्दी कायम आहे़ एकीकडे गर्दी टाळण्यासाठी रस्ते बंद करायचे आणि दुसरीकडे स्वत: मात्र गर्दी करायची़़़
अतिक्रमण विभाग करणार कारवाई
४एखादी कॉलनी किंवा सोसायटीने आपला रहिवासी विनाकारण बाहेर जावू नये अथवा अन्य कुणीही आत येवू नये यासाठी त्यांचा खाजगी परिसर बंद केल्यास अडचण नाही़ परंतु रहदारीचा मार्ग किंवा मुख्य रस्ता बंद करणे चुकीचे आहे़ असे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत़ रस्ते बंद केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत़ त्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला दिल्या आहेत़, अशी माहिती मनपा आयुक्त अजीज शेख यांनी दिली़ रहदारीचे रस्ते खुले झाले तर अत्यावश्यक सेवेतील चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे़ शिवाय जीवनाश्यक वस्तुंची वाहतुकही सुरळीत होईल़

Web Title: Roads to the colonies closed, harassing essential servants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे