बंदुकीचा धाक दाखवून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 10:25 PM2018-11-03T22:25:42+5:302018-11-03T22:26:28+5:30

शिरपूर : हवेत गोळीबार करत ३७ हजार लांबवले, महामार्गावरील घटना

Robbery with guns | बंदुकीचा धाक दाखवून लूट

बंदुकीचा धाक दाखवून लूट

Next
ठळक मुद्देमहामार्गालगत सुळे फाट्यानजिकची घटनाशस्त्रांचा धाक दाखवित ३७ हजारांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : मुंबई-आग्रा राष्टÑीय महामार्गालगत असलेल्या सुळे फाट्यानजिक अज्ञात दरोडेखोरांनी बंदूक व धारदार शस्त्राचा धाक दाखवून चौघांकडून ३७ हजार रूपयांची लूट केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल झाला. 
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील ऊसतोड ठेकेदार या परिसरातील मजूर घेण्यासाठी आले होते़ 
त्यावेळी त्यांच्या ताब्यातील वाहन दरोडेखोरांनी थांबवून हवेत गोळीबार करत गाडीतील मुक्ताजी रंगनाथ चोपडे (४३) रा़तामसवाडी, ता़नेवासा, जि़अहमदनगर, सुनिल भाऊसाहेब नेमाने (३०), गोरक्षनाथ सोपन आरसुडे (३९) व संजय किसन मोकाने (३५) या चौघांना धमकावले़ त्यांच्याकडील रोख ३७ हजार रूपये व दोन मोबाईल असा एकूण ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी हिसकावून नेला़ त्यावेळी चौघे ऊसतोड ठेकेदार व दरोडेखोर यांच्यात चांगलीच झटापट झाली़ त्यात ऊसतोड ठेकेदार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले़ यावेळी दरोडेखोरांनी चौघांपैकी सुनिल नेमाने याचे अपहरण केले़ मात्र घटनेचे वृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत व सहायक पोलीस निरीक्षक किरण खेडकर यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरापर्यंत अपहरण झालेल्या ठेकेदारास जंगलातून शोधून काढले़ मुक्ताजी चोपडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ४ दरोडेखोरांविरूध्द भादंवि कलम ३०७, ३९४, ३४ सह कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़

Web Title: Robbery with guns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.