बुद्धिवर्धक औषधाच्या नावाने ग्रामस्थांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:22 PM2018-12-11T22:22:02+5:302018-12-11T22:22:32+5:30
शिंदखेडा तालुका : आरोग्य विभागाने लसचे नुमने तपासणीसाठी पाठविले, अहवाल आल्यानंतर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : तालुक्यातील पाटण येथे गेल्या दोन तीन दिवसासापासून बुद्धिवर्धक औषधाच्या नावाने सुरु असलेला गैरप्रकार काही जागरूक ग्रामस्थांनी उघडकीस आला. त्यानंतर आरोग्य विभागाने औषध तपासणीसाठी पाठविली. त्यात काही गैरप्रकार आढळल्यास कारवाईचे आश्वासन दिले.
सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील गावांमध्ये काही दिवसांपासून एक टोळी सक्रिय आहे. ते गावात जाऊन बुद्धिवर्धक आयुर्वेदिक लसच्या नावाने नोंदणी करत होती.
एका बाटलीचे १२० रुपयाप्रमाणे लोकांकडून घेऊन नोंदणी करत होते. आमचे औषध हे बुद्धिवर्धक असून यामध्ये, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, बुद्धी, आकलन, स्मृती, चांगल्या प्रकारे कार्य करतात. एलर्जी पासून संरक्षण करते.
९ महिने ते १६ वर्षापर्यंतच्या मुलाची बुद्धी वाढण्याचा दावा करतात, असे सांगून गावातील लोकांकडून १२० प्रमाणे पैसे गोळा करत होते. दोन दिवसात पाटण गावात १५० ते २०० बाटल्यांची नोंदणी केली होती.
६ डिसेंबरला लोक गावात औषध वाटप करत असताना या प्रकारात काही तरी गडबड असल्याचा संशय आल्यावर गावातील नागरिक चंद्रकात माळी यांनी विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देत होते. या सर्व प्रकार बाबत तालुका आरोग्य अधिकाºयांशी संपर्क केला असता, त्यांनी असा कुठल्याही संस्थेला परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. ते गावात दाखल झाले. गावातील लोकांनी अधिकाºयांना सर्व प्रकार लक्षात आणून दिला असता अधिकाºयांनी पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्याकडे मुद्देमाल व औषध विक्री करणाºया दोघांना पोलीस स्टेशन जमा करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे सांगितले.