शेळ्या-मेंढ्यांसाठी रान मोकळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 01:27 PM2019-03-05T13:27:13+5:302019-03-05T13:27:36+5:30
कापडणे : पाणीटंचाईमुळे पांढऱ्या कांद्याची रोपे कवडीमोल, दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल
कापडणे : शेतकऱ्यांनी अतोनात मेहनत घेऊन शेतात पांढºया कांद्याची रोपे तयार केली. मात्र, पाणीटंचाई असल्याने शेतकऱ्यांना ही कांदा रोपे विक्रीस काढावी लागली. परंतू सातत्याने कांद्याला तुटपुंजा भाव मिळत असल्याने उन्हाळी कांदा लागवडीकडे शेतकºयांनी पाठ फिरविल्यामुळे या रोपांना ग्राहकच उपलब्ध झाले नाही. अखेर आर्थिक फटका सहन करीत शेतकºयांनी कांदा रोपाच्या शेतात शेळ्या-मेंढ्यांना चारण्यास मुभा दिल्याचे भयावह वास्तव धमाणे शिवारात दिसून आले.
धुळे तालुक्यातील धमाणे, न्याहळोद, बिलाडीरोड, देवभाने, कौठळ, धनुर, तामसवाडी आदी शिवारातील शेतकºयांनी उन्हाळी हंगामात पांढरा कांदा पिकाची लागवड करण्यासाठी आप-आपल्या शेतात पाणीटंचाईचे नियोजन करूनही कांदा रोपाची लागवड केली.
मात्र, सर्वत्र शेत शिवारातील विहिरी, कुपनलिकांची पाण्याची पातळी कमालीची खोल गेली आहे. अनेक ठिकाणी विहिरी आटल्या आहेत. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात ज्या विहिरी दीड ते दोन तास चालायच्या. त्याच विहिरी व कूपनलिका आता केवळ वीस ते तीस मिनिट चालतात तर काही विहिरीमधून शेतात गुरांना पाणी पाजण्यासाठी बांधण्यात आलेले पाण्याचे हौदच जेमतेम भरतात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कांदा पिक घेणे शक्य नसल्याने अनेक शेतकºयांनी मोठ्या आशेने तयार केलेली पांढºया कांद्याची रोपे विक्रीसाठी काढली. मात्र, कांदा रोपे घेण्यासाठी कुणीही शेतकरी इच्छूक नसल्याने दीड महिने जीवापाड जपलेल्या कांदा रोपांचे करायचे काय, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला. आणि अखेर शेतकºयांनी कांदा रोपाच्या शेतात शेळ्या मेंढ्यांना चारण्यास गुराख्यांना मुभा दिली आहे.