रोहयोची भिस्त 15 हजार मजुरांवर!
By admin | Published: March 1, 2017 12:00 AM2017-03-01T00:00:41+5:302017-03-01T00:00:41+5:30
जिल्हा परिषद : सर्वाधिक साक्री तालुक्यात, तर शिरपुरात कमी कामांचा समावेश
धुळे : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत रोजगार हमी योजनेची कामे जिल्हाभरात सुरू आहेत़ 1 हजार 427 कामांवर 15 हजार 557 मजूर कार्यरत आहेत़ विशेष म्हणजे सर्वाधिक साक्री तालुक्यात, तर कमी शिरपूर तालुक्यात कामे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली़
सिंचन विहिरींची कामे धुळे तालुक्यात 124 ठिकाणी सुरू आहेत़ त्यावर 1 हजार 417 मजूर कार्यरत आहेत़ साक्रीत 369 कामांवर 3 हजार 514 मजूर, शिंदखेडय़ात 448 कामांवर 6 हजार 14 मजूर आणि शिरपुरात 160 कामांवर 1 हजार 827 मजूर काम करत आहेत़ सार्वजनिक विहिरींची कामे धुळे तालुक्यात 5 ठिकाणी सुरू आहेत़ त्यावर 85 मजूर काम करत आह़े शिंदखेडय़ात 2 कामांवर 47 मजूर आहेत़ साक्री आणि शिरपूर तालुक्यात एकही काम देण्यात आलेले नाही़ वृक्ष लागवडीचे काम धुळे तालुक्यात केवळ एकाच ठिकाणी सुरू असून त्यावर 4 मजूर काम करत आहेत़ शिरपूर तालुक्यात 11 कामांवर 70 मजूर आहेत़ साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात एकही काम सुरू नाही़ फळबाग लागवडीची धुळे तालुक्यात 26 कामे सुरू असून त्यावर 93 मजूर आहेत़ साक्री तालुक्यात 79 कामांवर 340 मजूर आणि शिंदखेडा तालुक्यात एका कामावर केवळ 6 मजूर काम करत आहेत़ शिरपूर तालुक्यात एकही काम सुरू नाही़ शेततळ्यांची कामे केवळ साक्री तालुक्यातच मार्गी लावली जात आहेत़ त्यात 12 कामांवर 117 मजूर काम करत आहेत़ धुळे, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात एकही काम नियोजित करण्यात आलेले नाही़ मातीबांधाची कामे काही ठिकाणी सुरू आहेत़ त्यात धुळे तालुक्यात 33 कामांवर 1 हजार 161 आणि शिरपूर तालुक्यात 2 कामांवर 139 मजूर कार्यरत आहेत़ साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात एकही काम सुरू नाही़ गांडूळ खताबाबतचे केवळ साक्री तालुक्यातच काम मार्गी लावले जात आह़े त्यात 2 कामांवर 8 मजूर कार्यरत आहेत़ धुळे, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात एकही काम देण्यात आलेले नाही़ इंदिरा आवास घरकुलाचीही कामे मार्गी लावले जात आहेत़ त्यात धुळे तालुक्यात 7 कामांवर 16 मजूर, साक्री 16 कामांवर 64 मजूर, शिंदखेडय़ात 2 कामांवर 6 मजूर आणि शिरपुरात 65 कामांवर 273 मजूर कार्यरत आहेत़ गुरांच्या गोठय़ाचे काम केवळ शिरपूर तालुक्यात एकाच ठिकाणी सुरू असून त्यावर 8 मजूर कार्यरत आहेत़ उर्वरित धुळे, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात एकही काम देण्यात आलेले नाही़ शोषखड्डय़ांच्याही कामांचा यात समावेश करण्यात आलेला आह़े यात केवळ धुळे तालुक्यात 6 ठिकाणी काम सुरू असून त्यावर 191 मजूर काम करत आहेत़ उर्वरित साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात याबाबत एकही काम घेण्यात आलेले नाही़
वैयक्तिक शौचालयाच्याही कामांचा यात समावेश आह़े धुळे तालुक्यात 45 कामांवर 124 मजूर कार्यरत आह़े साक्रीत 3 कामांवर 15 मजूर, शिंदखेडय़ात 7 कामांवर 18 मजूर कार्यरत आहेत़ शिरपूर तालुक्यात मात्र एकही काम नसल्याचे आकडेवारीवरून समोर आलेले आह़े
एकत्रित कामे लक्षात घेतल्यास धुळे तालुक्यात 247 कामांवर 3 हजार 91 मजूर, साक्री तालुक्यात 481 कामांवर 4 हजार 58 मजूर, शिंदखेडा तालुक्यात 460 कामांवर 6 हजार 91 मजूर आणि शिरपूर तालुक्यात 239 कामांवर 2 हजार 317 मजूर कार्यरत आहेत़ तर रस्ता खडीकरण, विहिरीचे पुनर्भरण, नापेड कंपोस्ट या प्रकारची कामे जिल्ह्यात कुठेही सुरू नाहीत़
जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार हमी योजनेंतर्गत कामांचा तपशील निश्चित होत असतो़ त्यासाठी मजुरांची संख्या वाढावी यासाठी प्रशासकीय पाठपुरावा सुरू असताना मजुरांनीदेखील पुढे येण्याची गरज आह़े