रोटरी क्लब फेमिना अध्यक्षपदी कल्पना अहिरे, मेघा कामेरकर सचिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 09:08 PM2020-07-22T21:08:05+5:302020-07-22T21:08:23+5:30

पदग्रहण समारंभ : महिला, शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा संकल्प

Rotary Club Femina President Kalpana Ahire, Megha Kamerkar Secretary | रोटरी क्लब फेमिना अध्यक्षपदी कल्पना अहिरे, मेघा कामेरकर सचिव

dhule

Next

धुळे : येथील महिलांचा रोटरी क्लब आॅफ धुळे फेमिनाच्या अध्यक्षपदी कल्पना दीपक अहिरे तर सचिवपदी मेघा विलास कामेरकर यांची निवड करण्यात आली. त्यांचा आणि कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ १७ जुलै रोजी अजमेरा आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सभागृहात आॅनलाईन पध्दतीने नुकताच पार पडला़
रोटरी क्लबचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर प्रशांत जानी यांनी पदाची शपथ दिली. यावेळी आशिषजी अजमेरा, महेश कुलकर्णी, सिद्धनाथ गरुड, आशिष पटवारी, हिता जानी उपस्थित होते. कल्पना अहिरे यांनी अध्यक्षपदाचा पदभार मावळत्या अध्यक्षा दीप्ती गोटी यांच्याकडून स्वीकारला तर मेघा कामेरकर यांनी सेक्रेटरी पदाचा पदभार श्वेता देशपांडे यांच्याकडून स्वीकारला.
रोटरी क्लबच्या नवीन कार्यकारिणीत मेघा कामेरकर, उपाध्यक्षा निकिता अग्रवाल, खजिनदार अनिता पाटील, रितू पटवारी , राजेश्वरी गांधी, श्वेता देशपांडे, राणू अजमेरा, नयना वाणी, रचना शिंदे तर सदस्य म्हणून कविता कुचेरिया, मेघा शिंपी, दीप्ती गोटी, स्मिता अजमेरा, ड्रीम प्रोजेक्टसाठी वैशाली लहामगे, साधना पटनी, वैशाली पाटील, मोनाली थोरात यांची निवड करण्यात आली आहे. पदग्रहण समारंभानिमित्त रोटरी क्लब फेमिनातर्फे धुळे येथील भोलेबाबा नगर परिसरातील मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करण्यात आली.
सामाजिक दातृत्व म्हणून वर्षभर सामाजिक, शैक्षणिक गरजा, आरोग्य शिबीर तसेच निराधार, विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी विविध आवश्यक शिबीर आयोजित करण्याचा तसेच ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी नाला खोलीकरण, जुने बंधारे दुरूस्ती करुन पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी काम करण्याचा मानस नवनियुक्त अध्यक्षा कल्पना अहिरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला़
रोटरी क्लबतर्फे नेहमी सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविले जातात़

Web Title: Rotary Club Femina President Kalpana Ahire, Megha Kamerkar Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे