शिरपूरला कृषी अधिकाऱ्याच्या टेबलावर ठेवले सडलेले पीके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 02:49 PM2020-09-09T14:49:30+5:302020-09-09T14:50:22+5:30
प्रहार जनशक्ती पार्टीचा राडा, नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
आॅनलाइन लोकमत
शिरपूर (जि.धुळे) :तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास उशीर होत असल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तालुका कृषी कार्यालयात राडा करण्यात आला. तसेच कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावरच सडके पीके ठेवली. कार्यालयाच्या आवारात सडलेल्या पिकांची रोपे फेकण्यात आल्याची घटना आज घडली.
शिरपूर तालुक्यात गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व भागातील नदी,नाले,जलाशये व सिंचन प्रकल्प काही प्रमाणात भरून नद्यांनी प्रवाहाचा वेग धरला आहे .कमी जास्त प्रमाणात होत असलेल्या पावसाने ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. पिके पिवळी पडली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे आतोनात नुकसान झाले आहे. जास्त पावसामुळे मुख्य पीक असलेले मुग,उडीद, कापूस ही पीके हातची गेली आहेत. आधीच शेतकरी करोनाचा आस्मानी संकटामुळे प्रचंड अडचणीत आला असून, त्याला आता अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. कोरोना काळात शेतकºयांचे होत्याचे नव्हते झाले. खरिपांच्या पिकांवर आशा होती. पाऊसही सुरवातीला चांगला झाला. नंतर अतिवृष्टीने पीके सडू लागली.सरकार घोषणा करते,परंतु अजूनही बँकांच्या धोरणामुळे शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध होत नाही.
नुकताच्या झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले असून,खरीप पिके पिवळी पडत आहे. मूग पिकाच्या शेंगा झाडावरचं सडायाला लागल्या आहेत. शेतीतील नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे त्वरित करून शेतकºयांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी.जेणेकरून खरिपाचे झालेले प्रचंड नुकसान शेतकरी रव्बी पीकांमधून जसे जमेल तेवढे भरून काढण्याचा प्रयत्न करतील. पण त्यासाठी रव्बी पेरणी आधीच त्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी प्रहार जनशक्तीची मागणी आहे.नुकसानीचे पंचनामे तात्काळ न झाल्यास कृषी कार्यालयातील कृषी अधिकाºयांसह सर्व मंडळ अधिकाºयांना काळे फासू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष शिरपूर यांच्या वतीने देण्यात आला.यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, विजय कोळी, स्वप्निल राजपूत, नितीन जाधव, निलेश कोळी, मनोज राजपूत, मुकेश पाटील, महेंद्र पाटील, योगेश माळी, प्रमोद बडगुजर, किशोर बोरसे, नाना माळी आदी उपस्थित होते.