कांद्याला 2600 रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 07:07 PM2017-08-05T19:07:32+5:302017-08-05T19:10:23+5:30
पिंपळनेर उपबाजार समितीमध्ये एकाच दिवसात 9 हजार क्विंटल कांदा खरेदी
ऑनलाईन लोकमत
पिंपळनेर,जि.धुळे, दि.5 - वाढता भाव मिळत असल्याने येथील उपबाजार समितीत शनिवारी शेतक:यांनी सुमारे 350 वाहनांमधून कांदा विक्रीसाठी आणला होता. दिवसभरात तब्बल 9 हजार क्विंटल कांद्याची खरेदी करण्यात आली. कांद्यास प्रतिक्विंटल 2600 रुपये असा भाव मिळाला. यामुळे लाखोची उलाढाल होत आहे. कांद्याला मागणी वाढल्याने स्वाभाविकपणे भावात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतक:यांनी चाळींमधील कांदा विक्रीस काढला आहे. भविष्यात भाव वाढतील, या अपेक्षेनेच शेतक:यांनी कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला होता. 23 जुलैनंतर कांद्याच्या दरात अचानक वाढ होऊन प्रतिक्विंटल 2655 रुपये भावाचा उच्चांक गाठला गेला होता. शनिवारी 2600 रुपयांर्पयत भाव मिळाला. भाववाढीचा फायदा घेण्यासाठी कांद्याची येथील उपबाजारात प्रचंड आवक होत आहे. त्यामुळे व्यापा:यांकडून या सर्वच कांद्याची खरेदी करण्यात येत आहे. वाढीव भावाचा फायदा शेतक:यांनी घ्यावा, असे मत व्यापा:यांत व्यक्त होत असून शेतक:यांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे. शनिवारी दिवसभरात 350 वाहनांमधील कांद्याचा लिलाव करण्यात आला. दर्जेदार कांद्याची 2600 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी झाली. 2300-2400 रुपये सरासरी भाव मिळाला. लहान कांद्यालाही (मोथरी) 1500 ते 2000 रु. प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. रोजी सुमारे 9 हजार क्विंटल कांद्याची खरेदी होत असून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.