ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:42 AM2019-04-13T11:42:35+5:302019-04-13T11:43:20+5:30
ग्रामपंचायत विभाग : आचारसंहिता भंग प्रकरण
आॅनलाइन लोकमत
धुळे :आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिंदखेडा पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी व शिरपूरचे ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर गावात असलेले राजकीय पक्षांचे बॅनर काढण्याच्या सूचना शिंदखेड्याच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे मोरे नामक ग्रामविकास अधिकाºयाने दुर्लक्ष केले. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर त्याठिकाणी पहाणी केली असता, गावात राजकीय पक्षाचे बॅनर आढळून आले. कामात हलगर्जीपणा केला त्यामुळे शिंदखेडा पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी मोरे यांना निलबित करण्यात आले.
तर निवडणूक काम करणे प्रत्येक शासकीय कर्मचाºयाला बंधनकारक असतांनाही शिरपूर पंचायत समितीचे ग्रामसेवक तडवी यांनी हा आदेश स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान या संदर्भात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.