अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी झटणारा सचिन जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:07 PM2020-01-11T23:07:51+5:302020-01-11T23:09:37+5:30
विवाहाचा खर्च वाचवून आत्महत्याग्रस्त मुलांना मदत
चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
स्वत: च्या लग्नाचा वायफळ खर्च टाळून लग्न साध्या पध्दतीने करून त्या खचार्तून जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ५० विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण करण्याचा अभिनव संकल्प करणारे ‘युवा नेतृत्व अॅड़ सचिन जाधव’ यांनी केला आहे़ प्रेरणादायी कार्याची सुरूवात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते दत्तक विद्यार्थ्यांना हमीपत्र वाटप करुन केले़
सचिन जाधव यांनी स्थापन केलेल्या छत्रपती फाऊंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी गरीब, अनाथ आदिवासी मुलांसोबत दिवाळी साजरी केली जाते़ हिवाळ्यात मायेची उब निर्माण होण्यासाठी मोफत स्वेटर वाटप, मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा यासाठी मतदार नोंदणी, सरकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी घरोघरी जावून जनजागृती करणे, गणेशोत्सवात स्वच्छता मोहीम, फ्री मेडिकल कॅम्प, मोफत आधारकार्ड नोंदणी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतफेरी काढून निधी संकलन केले. लाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्यसाधून जिल्हा व राष्ट्रीयस्तरावरील खेळाडूंचा सत्कार, सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान सोहळा, जिल्ह्यातील बेरोजगार युवक व युवतींना मोफत प्रशिक्षणाद्वारे आतापर्यत दोनशे युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे़
छत्रपती फाऊंडेशन व दानशुर व्यक्तीच्या मदतीने गेल्या बारा वर्षापासून जिल्हयातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दप्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली आहे़ दरवर्षी १० अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जाते़ विद्यार्थ्यांना लागणारा शैक्षणिक खर्च मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांना धनादेशद्वारे दिला जातो. विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची इच्छा असेपर्यत संस्थेकडून मदत केली जाते़ शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी दर महिन्याने करिअर मार्गदर्शन, पोलीस-सैनिक भरती मार्गदर्शन शिबीर राबविले जाते. महिला व विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून रोड-रोमिओवर पोलिस प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी यामागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले.
गरोदर महिलेला दिला मदतीचा हात -
शहरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याजवळ २७ आॅक्टोबर २०१७ रोजी एक मनोरूग्ण महिला हताशपणे बसलेली होती़ काहीच्या लक्षात आले तर अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले होते़ याविषयाची माहिती अॅड़ सचिन जाधव व विक्की जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात दिली़ सदरील महिला सहा ते सात महिन्याची गरोदर होती़ तिच्या उपचारासाठी छत्रपती संस्थेकडून मदत करण्यात आली़
प्रत्येक आई-वडीलांची इच्छा असते, की मुलांचे लग्न चालीरिती, रूढी पंरपरानुसार व्हावे, यासाठी लाखो रूपये खर्च केले जातात. मात्र आयुष्याचा आनंद एकीकडे ठेवून आत्महत्याग्रस्त पालकांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यासाठी साध्या पद्धतीने विवाह केले. विवाहासाठी होणारा खर्च वाचवून तो पैसा अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी करण्याचा संकल्प केला़ त्यासाठी माझ्या पत्नीनेही साथ दिली. आम्ही दोघांनी अमरावती येथे जावून शेतकºयांसाठी लढा देणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन यासाठी त्यांचे आशिर्वाद घेतले़ यापुढे देखील गरीब अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी छत्रपती फाऊं डेशन खंबीरपणे पाठीशी उभी असेल़
- अॅड़ सचिन जाधव