महिलांची सुरक्षा ‘गॅस’वर

By Admin | Published: January 25, 2016 12:19 AM2016-01-25T00:19:33+5:302016-01-25T00:19:33+5:30

नंदुरबार : शहरातील माळीवाडय़ात गेल्या दोन महिन्यांपूर्वी गॅस सिलिंडरच्या गळतीने घराला आग लागून वित्तहानी झाली.

The safety of women on 'gas' | महिलांची सुरक्षा ‘गॅस’वर

महिलांची सुरक्षा ‘गॅस’वर

googlenewsNext

नंदुरबार : शहरातील माळीवाडय़ात गेल्या दोन महिन्यांपूर्वी गॅस सिलिंडरच्या गळतीने घराला आग लागून वित्तहानी झाली. यानंतर तळोदा येथे आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडरच्या सुरक्षेत केलेली कुचराई कशी जीवावर बेतू शकते याचा अनुभव मुंबईत गेल्या महिन्यात आला. त्याचप्रमाणे गॅस सुरक्षेबाबत नंदुरबार शहरातही उदासीनता असल्याचे

गॅस बचत-सुरक्षितता पंधरवडा साजरा करण्यात आला. याबाबत गॅस कंपन्यांतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. नंदुरबार शहरात नंदुरबार गॅस कंपनी, बालाजी गॅस एजन्सी आणि कल्याणी गॅस एजन्सी अशा तीन गॅस सिलिंडर पुरविणा:या एजन्सी आहेत. नंदुरबार तालुक्यात 45 हजारांवर ग्राहक आहेत.

लोकमतचमूने केलेल्या सव्रेक्षणातून आढळले.

अधिकृत मेकॅनिककडून नियमित तपासणी करून घेणा:यांचे प्रमाण केवळ 15 टक्के, तर 20 टक्के कुटुंबे कधी-कधी तपासणी करून घेतात. सिलिंडर घेताना 99 टक्के कुटुंबांनी वजनाची खात्री करून घेण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले.

दरम्यान, प्रशासनानेही सिलिंडर वापरण्याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याची गरज आहे, असे वाटते.

लोकमतने गॅस सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गृहिणींसमोर प्रश्नावली सादर केली. यातून गॅसच्या सुरक्षेबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत कसे दुर्लक्ष होते हे स्पष्ट झाले. वर्षानुवर्षे रबर टय़ूब बदलली जात नाही. 70 टक्के कुटुंबात सिलिंडरची रबरी टय़ूब चार वर्षानंतरही बदलली जात नाही. 69 टक्के गृहिणी गॅसचे काम आटोपल्यावर रेग्यूलेटरदेखील बंद करीत नाहीत. बाहेरगावी जाताना 60 टक्के कुटुंब रेग्यूलेटर बंद असल्याची खात्री करीत नसल्याचे आढळले.

Web Title: The safety of women on 'gas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.