जेवणासाठी उठविले म्हणून पत्नीला जाळणा:या पतीला जन्मठेप

By admin | Published: June 24, 2017 05:34 PM2017-06-24T17:34:13+5:302017-06-24T17:34:13+5:30

वाघाडीच्या खटल्यात धुळे न्यायालयाने दिला निकाल

For the sake of the wedding, the wife should be burnt to death: this husband's life imprisonment | जेवणासाठी उठविले म्हणून पत्नीला जाळणा:या पतीला जन्मठेप

जेवणासाठी उठविले म्हणून पत्नीला जाळणा:या पतीला जन्मठेप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे,दि.24 - जेवणासाठी उठविल्याच्या रागातून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून खून करणा:या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आह़े हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़ सी़  बावस्कर यांनी दिला़ 
धुळे तालुक्यातील वाघाडी येथे शैलाबाई अभय पाटील (वय 30) हिने 14 ऑक्टोबर 2015 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पती अभय पाटील याला जेवणासाठी उठविल़े त्याचा राग येऊन त्याने पत्नीला शिवीगाळ करून तिच्या अंगावर रॉकेल टाकत पेटती चिमणी अंगावर टाकली होती़ त्यात शैलाबाई या गंभीररित्या भाजल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू झाला़ तिच्या मृत्यपुर्व जबाबावरून पती अभय नाना पाटील यांच्याविरूध्द नरडाणा पोलीस पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल  होता़  
खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़ सी़ बावस्कर यांच्या पुढे चालल़े खटल्यात साक्ष व पुरावे ग्राह्य धरून अभय पाटील याला भादंवि कलम 302 मध्ये जन्मठेप व 1 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास  तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली आह़े सरकारपक्षातर्फे सरकारी वकील पराग पाटील यांनी कामकाज पाहिल़े 

Web Title: For the sake of the wedding, the wife should be burnt to death: this husband's life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.